मनुस्मृती महिलांना सन्मानाचे स्थान देते – उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रतिभा सिंह

150

भारतीय स्त्रिया धन्य आहेत, कारण भारतीय संस्कृती आणि मनुस्मृतीसारखे धर्मग्रंथ यांनी हिलांना अतिशय सन्मानाचे स्थान दिले आहे, असे उद्गार दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी काढले.

फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) द्वारे विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि गणित (STEM) मधील महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे, अदृश्य अडथळ्यांचा सामना करणे या विषयावर आयोजित परिषदेच्या उद्घाटन सत्रात न्यायाधीश बोलत होते.

आशियाई देश महिलांचा अधिक सन्मान करतात

मला खरोखर वाटते की, भारतातील आम्ही महिला धन्य आहोत, कारण आपल्या धर्मग्रंथांनी नेहमीच स्त्रियांना खूप आदराचे स्थान दिले आहे. मनुस्मृतीनेच म्हटले आहे की, जर तुम्ही स्त्रियांचा आदर आणि सन्मान केला नाही, तर तुम्ही केलेली पूजापाठ आराधना सगळे व्यर्थ आहे. त्यामुळे आपले पूर्वज आणि वैदिक धर्मग्रंथ यांना महिलांचा आदर कसा करायचा हे चांगले माहीत होते, असेही न्यायमूर्ती प्रतिभा सिंह म्हणाले. आशियाई देश महिलांचा अधिक सन्मान करतात, खरे तर आशियाई देश घराघरात, कामाच्या ठिकाणी, समाजात, सर्वसाधारणपणे स्त्रियांचा आदर करण्यामध्ये खूप चांगले काम करतात, कारण सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमीमुळे हे होत आहे. महिला नेतृत्वाच्या भूमिकेत असण्याबाबत भारत अधिक प्रगतीशील आहे, असेही त्या म्हणाल्या.

(हेही वाचा मोठी बातमी! कोयना धरणाचे सगळे दरवाजे उघडले)

महिलांनी संयुक्त कुटुंबात रहावे 

आपण महिलांवरील हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले पाहिजे, महिलांवर होणार्‍या अन्यायाकडे दुर्लक्ष केले पाहिजे, असे आपण कधीच म्हणत नाही. खालच्या स्तरावर, परंतु होय उच्च स्तरावर आणि मध्यम स्तरावर आपण महिला सबलीकरण झालेले पाहत आहोत, असेही न्यायमूर्ती प्रतिभा सिंह म्हणाल्या. नोकरदार महिलांननी भारतीय कुटुंब व्यवस्थेची मूलभूत मूल्ये बळकट करण्याकरता तसेच त्यांचे करिअर अधिक उत्तम बनवण्यासाठी संयुक्त कुटुंबात राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. संयुक्त कुटुंब पद्धती चालू राहिली पाहिजे, कारण त्याचे फायदे विभक्त कुटुंबांपेक्षा कितीतरी जास्त आहेत. संयुक्त कुटुंबातील पुरुष महिलांचे वय मोठे आणि अनुभव असल्याने प्रोत्साहन मिळते, असेही न्यायमूर्ती सिंह म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.