लोकशाहीत देशातील युवकांचा सहभाग जितका वाढेल, तितके देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, या देशाचा युवक या देशाचे सामर्थ्य आहे. त्यामुळे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांनी राजकारणात यायला हवे. भारतीय युवा राजकारणात आल्यास घराणेशाहीतील राजकारण संपुष्टात येईल, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तरुणांना दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (१२ जानेवारी) नाशिकमध्ये २७व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यावेळी झालेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी तरुणांना संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – Narendra Modi: नाशिकमध्ये नरेंद्र मोदींवर पुष्पवृष्टी, काळारामाचेही घेतले दर्शन )
मतदार प्रक्रिया पूर्ण करण्याचे तरुणांना आवाहन…
यावेळी तरुणांना उद्देशून ते म्हणाले की, राजकारणातील घराणेशाहीमुळे नुकसान झाले आहे. जे तरुण राजकारणात येणार नाहीत, त्यांनी मतदान करायलाच हवे, जे युवक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. ते परिवर्तन घडवून आणू शकतात. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव येण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रीया पूर्ण करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. मतदान करून देशाच्या विकासात आपला सहभाग नोंदावा आणि जास्तीत जास्त मतदान करा, असेही मोदी म्हणाले.
कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करू नका
आपल्या अधिकारांसोबतच आपल्या कर्तव्याचे पालन देशातील युवकांनी करावे. तेव्हाच आपला देश आणि समाजाची उन्नती होईल. त्यासाठी तरुणांनी मेड इन इंडिया प्रोडक्टचा वापर करावा. कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करू नका तसेच आई-बहिणींच्या नावाने शिव्या देणे बंद करा, चुकीच्या रुढी बंद करा, असे आवाहनही त्यांनी तरुणांना केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community