भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळावा आणि व्हिसा मिळण्याच्या प्रक्रियेतील विलंब कमी व्हावा याकरता अमेरिका प्रयत्नशील आहे. तर व्हिसाच्या मुद्द्यावर भारत हा देश आमच्या जागतिक प्राधान्यक्रमातील एक असल्याची माहिती अमेरिकेच्या भारतातील राजदूत एलिझाबेथ जोन्स यांनी मंगळवारी दिली. याकरता अमेरिका प्राधान्याने काम करत आहे.
कोरोना महामारीमुळे अमेरिका व्हिसाची प्रक्रिया थंडावली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भारतीयांना व्हिसाची प्रतीक्षा आहे. यामध्ये विविध श्रेणीतील व्हिसा आहेत. व्हिसाचे काम आता सुरू झाले असले तरी अद्यापही प्रतीक्षा यादी आणि विलंब होत आहे. मात्र या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हिसा कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यासह व्हिसासाठी आवश्यक बॅक ऑफिस कामासाठी भारताबाहेरील अमेरिकी कर्मचाऱ्यांची देखील मदत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी आताच्या तुलनेत सर्वाधिक व्हिसा कर्मचारी संख्या भारतात असणार, असेही एलिझाबेथ जोन्स यांनी सांगितले.
(हेही वाचा – ऐन गर्दीच्या वेळी ‘मध्य रेल्वे’ची वाहतूक विस्कळीत, मुंबई लोकलच्या प्रवाशांचा खोळंबा)
पुढे ते असेही म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत व जगातील सर्वात जुनी लोकशाही व्यवस्था असलेला देश म्हणजे अमेरिका आता एकमेकांचे नैसर्गिक भागीदार आहेत. त्यामुळे नवे उद्योग, विकासात्मक कामे आदी मुद्यांवर दोन्ही देश एकत्रितपणे काम करत असून याचा मोठा फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community