जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये भारताची १३ शहरे; IQAir च्या अहवालात दावा

78
जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये भारताची १३ शहरे; IQAir च्या अहवालात दावा
जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये भारताची १३ शहरे; IQAir च्या अहवालात दावा

जगातील सर्वाधिक वायू प्रदूषित (Air pollution) 20 शहरांच्या यादीत भारताच्या 13 शहरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आसामचे बर्निहाट हे देशातील सर्वाधिक वायू प्रदूषित (Air pollution) शहर ठरले आहे. स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी (Swiss Air Quality Technology Company) ‘आयक्यूएअर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्टमधून (World Air Quality Report) समोर आली आहे. (IQAir )

( हेही वाचा : Infiltrators : घुसखोरांपासून देश सुरक्षित करण्यासाठी येणार नवा कायदा? काय आहेत वैशिष्ट्ये?

स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी (Swiss Air Quality Technology Company) ‘आयक्यूएअर’ने जारी केलेल्या वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2024 अनुसार दिल्ली ही जागतिक स्तरावर सर्वात वायू प्रदूषित राजधानी ठरली आहे. तसेच जगातील चौथ्या क्रमाकांचे वायू प्रदूषित शहरही ठरले आहे. भारत 2024 मध्ये जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात वायू प्रदूषित देश ठरला होता. तर 2023 मध्ये तिसऱ्या स्थानावर होता. अहवालानुसार,जगातील सर्वात प्रदूषित 10 शहरांपैकी 6 शहरे भारतातील आहेत. दिल्लीमध्ये प्रदूषणाची उच्च पातळी नोंदवली जात आहे, वार्षिक सरासरी पीएम 2.5 एकाग्रता प्रति घनमीटर 91.6 मायक्रोग्राम आहे. जी 2023 मध्ये प्रति घनमीटर 92.7 मायक्रोग्राम होती, जी जवळजवळ बदललेली नाही. (IQAir)

जगातील सर्वाधिक वायू प्रदूषित 20 शहरांपैकी 13 शहरे भारतातील आहेत. त्‍यामध्‍ये बर्निहाट, दिल्ली, मुल्लानपूर (पंजाब), फरीदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुडगाव, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) , हनुमानगड (Hanumangarh) आणि नोएडा यांचा समावेश आहे. एकूणच, 35 टक्के भारतीय शहरांमध्ये वार्षिक पीएम 2.5 पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या 5 मायक्रोग्राम प्रति घनमीटर मर्यादेपेक्षा 10 पट जास्त आहे. भारतात वायू प्रदूषण हा एक गंभीर आरोग्य धोका आहे, ज्यामुळे आयुर्मान अंदाजे 5.2 वर्षांनी कमी होते. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ (Lancet Planetary Health) अभ्यासानुसार, 2009 ते 2019 पर्यंत, भारतात दरवर्षी प्रदूषणामुळे सुमारे 15 लाख मृत्यू झाले आहेत. (IQAir )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.