एन.एस. कृष्णन (N.S. Krishnan) हे विनोदवीर होते. त्यांचे पूर्ण नाव नागरकोइल सुदलाइमुथू कृष्णन असे होते. त्यांना कलाइवनार म्हणजेच कलाप्रेमी आणि एनएसएके देखील म्हटले जायचे. एन.एस. कृष्णन विनोदी अभिनेते तर होतेच त्याचबरोबर लेखक आणि गायकही होते. तामिळ सिनेसृष्टीवर त्यांनी विनोदी कलाकार म्हणून अधिराज्य गाजवले.
त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९०८ रोजी झाला. त्यांचा विवाह अभिनेत्री टी.ए. मधिराम यांच्याशी झाला. प्रसिद्ध तामिळ अभिनेते आणि राजकीय नेते करुणानिधी यांना एका पत्रकाराने विचारले की, त्यांना कोणता असा अभिनेता आवडतो जो राजकीय क्षेत्रात उतरलेला नाही. तेव्हा करुणानिधी यांनी कृष्णन यांचे नाव घेतले. करुणानिधी यांनी त्यांच्यासोबत चित्रपटांमध्येही काम केले आहे. कृष्णन (N.S. Krishnan) म्हणजेच कलाइवनार हे द्रविड चळवळीचे सक्रिय सदस्य होते. कलाइवनार आर्ट्स सेंटर या इमारतीचे नाव त्यांच्या नावावरुनच ठेवले आहे. त्यांनी १२५ पेक्षा अधिक चित्रपटांत काम केले आहे. त्यांना भारताचा चार्ली चॅप्लिन देखील म्हटले जाते. ३० ऑगस्ट १९५७ रोजी मद्रासच्या जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Join Our WhatsApp Community