चित्रपटात फडकला वीर सावरकरांचा ध्वज, पण झाली एक चूक…

201

एसएस राजा मौली यांचा बहुचर्चित चित्रपट फिल्म ‘RRR’ चा ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर सर्वत्र ट्रेंड करत आहे. या ट्रेलरमधील एका दृश्यात, ज्युनियर एनटीआरच्या हातात तीन रंगांचा ध्वज दिसत आहे. हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या या ध्वजात फुले, चंद्र आणि सूर्य दिसत आहे, तर मधल्या पिवळ्या पट्टीत वंदे मातरम् लिहिलेले आहे. हा ध्वज देशाचा ‘पहिला तिरंगा’ असून १९०७ मध्ये फडकवण्यात आला होता. त्यानंतर ध्वजाचे स्वरूप वेळोवेळी बदलत राहिले. ‘आरआरआर’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा झेंडा दाखवण्यात आला आहे. वीर सावरकर यांच्या संकल्पनेतून या ध्वजाची निर्मिती झाली, तरी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याचा उल्लेख दिसत नाही, त्यामुळे सावरकरप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.

चित्रपटाची कथा १९०७ च्या स्वातंत्र्यपूर्व काळातील 

साऊथचा सुपरस्टार रामचरण तेजा आणि ज्युनियर एनटीआर या अभिनेत्यांच्या चित्रपटाचा अवघ्या ३ मिनिटांचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ब्रिटिश राजवटीविषयी कथा दाखवण्यात आली असून, त्यात मैत्री, देशभक्ती, संघर्ष चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांसारखे दिग्गज बॉलिवूड कलाकार सुद्धा आहेत. हा चित्रपट स्वातंत्र्यपूर्व काळातील १९०७ च्या आसपासची कथा सांगत आहे. या चित्रपटात भारताचा पहिला ध्वज फडकवण्यात आला आहे. १८ ते २४ ऑगस्ट १९०७ दरम्यान स्टुटगार्ट, जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जगातील ९०० प्रतिनिधी साम्राज्यवाद, लष्करीकरण, हस्तांतरण आणि महिला मताधिकार यावर चर्चा करणार होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर निर्मित भारताचा हा ध्वज फडकवण्यात आला होता.

( हेही वाचा : समीर वानखेडेंची बदली, महसूल गुप्तचर संचालनालयात पुन्हा नियुक्ती )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.