Foreign Exchange Reserves : भारताचा परकीय चलन साठा दोन महिन्यांच्या नीच्चांकी स्तरावर

रुपयात झालेल्या घसरणीमुळे देशाच्या परकीय चलनात घट झाली आहे.

144
Foreign Exchange Reserves : भारताचा परकीय चलन साठा दोन महिन्यांच्या नीच्चांकी स्तरावर
Foreign Exchange Reserves : भारताचा परकीय चलन साठा दोन महिन्यांच्या नीच्चांकी स्तरावर
  • ऋजुता लुकतुके

रुपयात झालेल्या घसरणीमुळे देशाच्या परकीय चलनात घट झाली आहे. आणि हा साठ ५९५ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचला आहे. दोन महिन्यांत पहिल्यांदाच हा साठा सहाशे अब्ज अमेरिकन डॉलरच्या खाली आला आहे. मागच्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात ७.३ अब्ज अमेरिकन डॉलरची घट होऊन परकीय साठा दोन महिन्यांच्या नीच्चांकावर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या ताज्या माहितीनुसार, परकीय चलनात अलीकडे आलेली घसरण मागच्या सहा महिन्यातील सर्वोच्च आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण हे यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. कारण, परकीय चलनात भारताने खरेदी केलेले बाँड आणि इतर असेट्सचं मूल्य रुपयातील घसरणीमुळे कमी झालं आहे. पण, त्यामुळे परकीय चलन साठा ६०० अब्जपेक्षा खाली गेला आहे. शिवाय रुपयाची आणखी पडझड होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकही आपल्याकडे असलेल्या अमेरिकन डॉलरची विक्री करत आहे. याचाही परिणाम परकीय चलनावर होत आहे. ११ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलन साठ्यात ७०८ दशलक्ष अमेरिकन डॉलरची भर पडली होती. आणि परकीय चलन साठा ६०२ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता.

(हेही वाचा – Indian-Origin Man Jailed: ब्रिटनमध्ये ड्रग्ज तस्करीप्रकरणी भारतीय वंशाच्या व्यक्तिला 12 वर्षांचा तुरुंगवास)

रिझर्व्ह बँकेनं आपल्याकडे असलेले २.५ ते ३ अब्ज अमेरिकन डॉलर रुपयाच्या स्थिरतेसाठी विकले. आणि अमेरिकन डॉलरमध्ये भारताकडे असलेले बाँड्सही ६.६ अब्ज अमेरिकन डॉलरने कमी झाले. (मूल्य कमी झालं) रुपयाचा विचार करता रुपयाचं मूल्य मागच्या एकाच आठवड्यात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ०.३१ टक्क्यांनी कमी झालं. १७ ऑगस्टला डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ८३.१५ रुपयांवर बंद झाला. अमेरिकेतही सध्या फेडरल बँकेच्या पतधोरणाची धामधूम आहे. आणि तिथे व्याजदरात पुन्हा वाढ होण्याचीच शक्यता आहे. तसं झालं तर आंतरराष्ट्रीय चलन बाजार हा मोठ्या चढ उतारांचा असू शकतो. त्यामुळे येणारा आठवडाही अशाच घटनांचा असू शकतो. किंबहुना बाजारातील चढउतार वाढू शकतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.