सुरक्षा परिषदेत एस.जयशंकर यांनी चीनचे टोचले कान, तर रशियावरही साधला निशाणा

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्याचा अमेरिका आणि भारताचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्र परिषदेत रोखल्याने भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेत चीनची कानउघाडणी केली आहे.

शांतता आणि न्याय मिळवण्यासाठीचा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे. सुरक्षा परिषदेने यावर स्पष्ट संदेश दिला पाहिजे. राजकारण्यांनी याबाबत जबाबदारी न टाळता दंडमु्क्तीला सुलभ करु नये. जगातील दहशतवाद्यांना यादीच्या मंजुरीबाबत या परिषदेत घेण्यात आलेली भूमिका खेदजनक आहे. दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत शिक्षा न मिळाल्यास दंडमुक्तीबाबत परिषदेतून मिळत असलेल्या संकेतांवर सातत्य राखणे गरजेचे आहे, असे जयशंकर हे चीनला उद्देशून म्हणाले आहेत.

( हेही वाचा: आदित्य सेनेच्या ‘टक्केवारी’मुळेच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार; नितेश राणेंचा हल्लाबोल )

‘ही’ चिंता वाढवणारी बाब 

या परिषदेत रशिया- युक्रेनमधील युद्धावरदेखील जयशंकर यांनी भाष्य केले आहे. संघर्षाच्या परिस्थितीतही आंतरराष्ट्रीय कायदे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये. बुका हत्याकांडाच्या स्वतंत्र तपासाच्या मागणीला भारताने समर्थन दिले होते, अशी आठवणही परिषदेला जयशंकर यांनी करुन दिली. युक्रेनमधील संघर्ष थांबवणे काळाची गरज असल्याचे, जयशंकर यांनी म्हटले आहे. पुतीन यांचा आण्विक हल्ल्याबाबतचा इशारा चिंता वाढवणारी बाब असल्याचे जयशंकर म्हणाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here