भारतीय वन सर्वेक्षण (FSI) ने तयार केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट २०२१ अहवालानुसार भारतातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भारतातील वनक्षेत्र आणि वृक्ष आच्छादनात गेल्या दोन वर्षांत दोन हजार २ हजार २६१ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. देशातील वृक्षाच्छादित क्षेत्र ८०.९ दशलक्ष हेक्टर आहे जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या २४.६२ आहे. देशातील मँग्रुव्हचे क्षेत्रही १७ चौरस किमीने वाढले आहे.
या राज्यात सर्वाधिक वाढ
देशातील काही राज्यातील वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली आहे.
१. आंध्र प्रदेश ६४७ चौरस किलोमीटर
२. तेलंगणा राज्यात ६३२ चौरस किलोमीटर
३. ओडिशा ५३७ चौरस किलोमीटर
( हेही वाचा : ठाण्याच्या मानपाड्याच्या बिबट्यावर वनविभागाची नजर )
ईशान्येकडील वनक्षेत्रात घट
क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेशात देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि नागालँड या राज्यातील वनक्षेत्रात घट झाली असून ईशान्येकडील राज्यांत एकूण १ लाख ६९ हजार ५२१ चौरस किमी (६४ टक्के) इतके वनक्षेत्र नोंदवले गेले आहे. तर, आदिवासी भागातील वनक्षेत्रात ६५५ चौरस किलोमीटरने घट झालेली आहे.
Join Our WhatsApp Community