भारताच्या हरनाझ संधूसाठी ‘21’ लकी! पटकवला विश्वसुंदरीचा किताब

94

अवघ्या 21 वर्षीय हरनाझ संधूने नुकताच ‘मिस दिवा मिस यूनिवर्स इंडिया 2021’ किताब आपल्या नावे केला. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा म्हणजेच विश्वसुंदरीचा किताब देखील तिने पटकावला आहे. यासह हरनाझला 12 डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला. त्यामुळे भारताच्या हरनाझला सर्वच बाजूने 21 हा नंबर लकी ठरला असल्याचे म्हणता येईल.

(हेही वाचा- ॲक्शन मोड ऑन! राज ठाकरेंचा आज नाशिक दौरा, कार्यकर्त्यांशी साधणार संवाद)

मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटरवर हरनाझने ‘मिस युनिवर्स 2021’चा किताब पटकवल्याची माहिती दिली. इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात हरनाझला मुकुट घातला गेल्याचा तो क्षण त्यांनी शेअर केला आहे. “नवी मिस युनिव्हर्स…इंडिया,” असे कॅप्शन त्या व्हिडिओला दिलेलं आहे. यावेळी हरनाझ सोबत मेक्सिकोची मिस युनिव्हर्स 2020ची आंद्रिया मेझा देखील या व्हिडिओमध्ये भावनिक झाली आहे.

जाणून घ्या हरनाझ संधूबद्दल…

फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझचा जन्म चंदीगडच्या जन्म शीख कुटुंबात झाला. तिने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. सध्या ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

  • २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता.
  • २०१८ मध्ये मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता.
  • हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले.
  • यावर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.