- ऋजुता लुकतुके
भारताची देशांतर्गत विमानसेवा देणारी इंडिगो एअरलाईन्स ही कंपनी डबघाईला आली आहे. आणि त्यामुळे वर्षभराहून जास्त काळ विमानसेवा बंद आहे. त्यासाठी आता कंपनीचे मालक गंगवाल कुटुंबीयांनी आपल्या हक्काचे समभाग विकण्याचं ठरवलं आहे. भारताची खाजगी विमान कंपनी इंडिगो एअरलाईन्सचे प्रायोजक गंगवाल कुटुंबीयांनी आपल्या हिस्याचे ३,७३० कोटी रुपये मूल्याचे समभाग ब्लॉक डीलमध्ये विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी १६ ऑगस्टला हे समभाग मुंबई शेअर बाजारात विक्रीसाठी येतील. इकोनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे. ब्लॉक डीलमध्ये १ कोटी ६० लाख शेअर विक्रीसाठी असतील.
या समभागांची किंमत २४०० रुपये प्रती शेअर असेल. सोमवारी शेअर बाजार बंद झाला तेव्हाच्या किमतीपेक्षा ५ टक्के सवलतीच्या दरात हे समभाग उपलब्ध होणार आहेत. जून २०२३ पर्यंत गंगवाल कुटुंबीयांकडे इंडिगो एअरलाईन्सचे २९.७२ टक्के समभाग होते. पण, कंपनीतील गंगवाल कुटुंबीयांचा हिस्सा ६७.७७ टक्के इतका आहे. आताची शेअरची किंमत पाहता गंगवाल यांच्या मालमत्तेचं मूल्य २९,२१८ कोटी रुपये इतकी आहे. तर कंपनीचं एकूण शेअर भांडवल ९८,३१३ कोटी रुपये इतकं आहे. जून २०२२ मध्ये गंगवाल कुटुंबीयांकडे कंपनीचे ३६.६६ टक्के समभाग होते. पण, राकेश गंगवाल यांनी तेव्हात आपल्याकडच्या हिस्याची टप्प्या टप्प्याने विक्री करू असं म्हटलं होतं.
(हेही वाचा – Throat Infection : घशाच्या संसर्गाला वेळ लागतोय…)
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात राकेश गंगवाल यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचाही राजीनामा दिला होता. आणि पुढच्या पाच वर्षांत कंपनीतील हिस्साही विकणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. २ जून रोजी इंडिगो कंपनीने २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल घोषित केले. यात कंपनीने एकूण नफा ३०९० कोटी रुपये असल्याचं म्हटलं होतं. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीचा तोटा १०६४ कोटी रुपये इतका होता. कंपनीचा नफाही २३४ टक्क्यांनी वाढल्याचं या निकालात म्हटलं होतं. कोरोनानंतर नियमित विमान प्रवास सुरू झाल्याने कंपनीच्या महसूलातही वाढ नोंदवली गेली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community