भारतात येणाऱ्या Indigo विमानाचं कराचीत इमर्जन्सी लँडिग! काय आहे कारण?

178

भारतात येत असलेल्या इंडिगो विमानाचं पाकिस्तानच्या कराचीत इमर्जन्सी लँडिग करण्यात आले आहे. शारजहाहून हे विमान हैद्राबादच्या दिशेने टेक ऑफ झाले होते. परंतु या विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने पाकिस्तानात त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विमानातील प्रवाशांना दुसऱ्या विमानाने हैद्राबाद येथे आणण्यात येणार आहे. तर गेल्या दोन आठवड्यात दुसऱ्यांदा भारतीय विमानाला कराचीमध्ये इमर्जन्सी लँडिग करावे लागेल.

(हेही वाचा – अनुस्कुरा घाटात आठवड्यात दुसऱ्यांदा कोसळली दरड, पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प)

मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात घेता विमानाच्या क्रू मेंबर्सनी तातडीने विमानाचे लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विमानाच्या वैमानिकांनी जवळच्या कराची विमानतळाशी संपर्क साधला आणि विमान कराचीच्या दिशेने वळवले. त्यानंतर कराची विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

गेल्या ४ दिवसांत दुसऱ्यांदा लँडिंग

गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा इंडिगोचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळतेय. यापूर्वी देखील १४ जुलै रोजी इंडिगोचं इमर्जन्सी लँडिंग जयपूर विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते. इंजिनमध्ये कंप जाणवू लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव १४ जुलै रोजी विमान मध्येच लँड करण्याचा निर्णय वैमानिकांनी घेतला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.