इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एक मोठ्या मशिदीला भीषण आग लागली आहे. या आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये मोठ्या जामा मशिदीला भीषण आग लागली. आग लागल्यानंतर मशिदीची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. जकार्ता इस्लामिक सेंटरच्या परिसरातील ही मशीद आहे. मात्र, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
( हेही वाचा: मुंबईतील ‘या’ तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार; पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर धमकीचा फोन )
Giant dome of Jakarta Islamic Centre Grand Mosque collapses after fire breaks out
Read @ANI Story | https://t.co/rYeIo5XYTq#Indonesia #MosqueCollapse #JakartaIslamicCentreGrandMosque pic.twitter.com/bzEDo1UGPN
— ANI Digital (@ani_digital) October 20, 2022
मशिदीचा घुमट पत्त्यांसारखा कोसळला
इंडोनेशियातील जकार्ता येथील इस्लामिक सेंटर मशिदीला बुधवारी भीषण आग लागली. आगीमुळे मशिदीचा घुमट पत्त्यांसारखा कोसळला. ही आग फार भीषण होती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मशिदीच्या घुमटाच्या नुतनीकरणाचे काम सुरु असताना, ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग इतकी वेगाने पसरली की काही वेळात ही आग मशिदीच्या घुमटात पसरली आणि मशिदीचा घुमट जमीनदोस्त झाला.
Join Our WhatsApp Community