हिंदी साहित्यासाठी भरीव योगदान देणारे Indra Bahadur Khare

हिंदी साहित्यिक, लेखक, कवी आणि प्राध्यापक Indra Bahadur Khare यांनी अवघ्या ३० वर्षांच्या आयुष्यात कथासंग्रह, काव्यसंग्रह लिहिले. भारताच्या महाविद्यालयात त्यांचे साहित्य शिकवले जाते.

220
हिंदी साहित्यासाठी भरीव योगदान देणारे Indra Bahadur Khare
हिंदी साहित्यासाठी भरीव योगदान देणारे Indra Bahadur Khare

इंद्र बहादूर खरे (Indra Bahadur Khare) हे हिंदी साहित्यिक, लेखक, कवी आणि प्राध्यापक होते. त्यांनी अनेक कविता, कथा, गाणी, कादंबरी लिहिल्या आहेत. ‘भोर के गीत’ ही त्यांची सर्वांत प्रसिद्ध रचना आहे. त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये गीतकार म्हणूनही काम केले. त्यांनी लिहिलेल्या कलाकृती आणि पुस्तकांचा भारतातील विविध महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Darshan Pass: शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शन पास देण्याबाबत कडक धोरण अवलंबण्याची परवानगी)

शिक्षण पूर्ण करण्यात आर्थिक अडचणी

खरे यांचा जन्म १६ डिसेंबर १९२२ रोजी मध्यप्रदेशातील गाडरवारा, नरसिंहपूर येथे झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना सुरुवातीच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अलाहाबाद विद्यापिठात (University of Allahabad) प्रवेश घेतला. येथे त्यांनी श्याम सुंदर वसतिगृहात राहून बी.ए.चा अभ्यास सुरू केला. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते जबलपूरला गेले आणि तिथे ते मिळेल ती नोकरी करू लागले. त्यातून पैसे गोळा करून त्यांनी हितकारिणी सिटी कॉलेजमध्ये (Hitkarini Law College – Jabalpur) प्रवेश घेऊन बी.ए.चा अभ्यास पूर्ण केला.

१८ व्या वर्षी ‘भोर के गीत’ या पहिल्या पुस्तकाचे लेखन

त्यांचा विवाह १९४६ मध्ये विद्यापती श्रीवास्तव यांच्याशी झाला. Indra Bahadur Khare यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ‘भोर के गीत’ हे पहिले पुस्तक लिहिले. १९४६ मध्ये जबलपूरच्या सरकारी मॉडेल स्कूलमध्ये त्यांनी १० महिने अध्यापन केले. येथे त्यांना सहकारी शिक्षक आणि साहित्यिक मित्र हरिशंकर परसाई यांचा सहवास लाभला. त्यांनी मिळून हरिंद्र (Harindra) या नावाने संयुक्त साहित्य प्रकाशित केले.

यानंतर त्यांनी १९४७ ते १९५२ पर्यंत आकाशवाणी, नागपूर, महाराष्ट्र येथे गीतकार आणि कथाकार म्हणून काम केले. याच काळात ते सहकारी लेखक डॉ. प्रसिध रामकुमार वर्मा यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी संयुक्तपणे ‘प्रकाश’ (Prakash) मासिकाचे संपादन केले. हे मासिक नागपूरच्या सरकारच्या समाज कल्याण विभागातर्फे प्रकाशित करण्यात आले.

(हेही वाचा – Darshan Pass: शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शन पास देण्याबाबत कडक धोरण अवलंबण्याची परवानगी)

साहित्यावर विद्यापिठांमध्ये संशोधन

भोर के गीत (Bhor Ke Geet), जीवन पथ के राही, सुरबाला, विजन ले फूल, रजनी के पाल, हेमू कालानी या कवितासंग्रहांचे त्यांनी लेखन केले आहे. आरती के दीप, सपनो की नगरी, आजाद के पहिले आजाद – हे त्यांनी लिहिलेले कथा संग्रह आहेत. काशमीर, जीवन पथ के राही, मेरे जीवन नहीं, लख होली यांसारख्या कांदबर्‍या त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यावर सध्या विद्यापिठांमध्ये अनेक संशोधने सुरू आहेत. मात्र १३ एप्रिल १९५३ मध्ये अगदी तरुण वयात, वयाच्या ३० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. नाहीतर त्यांनी नक्कीच साहित्यात क्रांती घडवून आणली असती. (Indra Bahadur Khare)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.