शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी यांना जामिन मिळाल्यानंतर तब्बल साडे सहा वर्षांनंतर तिचा सुटका झाली. त्यानंतर ती माध्यमांशी बोलताना, ‘मी स्वतःला पुस्तक लिहिण्यात गुंतवून घेणार आहे, मात्र या पुस्तकात खटल्या संदर्भात तसेच तुरुंगातील घडीमोडीबाबत काहीही नसेल, असे तिने स्पष्ट केले.
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन मिळाल्यानंतर ती शुक्रवारी सायंकाळी भायखळा तुरुंगातून बाहेर पडली. इंद्राणीने वकीलासह थेट वरळी येथील तिचे घरी गाठले. तुरुंगात असताना आणि तुरुंगातून बाहेर पडलेल्या इंद्राणीला बघून अनेकांना आश्चर्य वाटले. कारण इंद्राणी ज्या वेळी तुरुंगातून बाहेर पडली त्यावेळी तिने केस काळे केले होते, चेहऱ्यावर हलकाशा मेकअप होता.
(हेही वाचा साडे सहा वर्षांनी इंद्राणी मुखर्जीला जामीन)
तुरूंगात सगळे काही मिळते
वरळीच्या घराबाहेर इंद्राणीने पत्रकाराची भेट घेतली, त्यावेळी तिने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना ‘मी आज खूप खूश आहे, मी आज मोकळ्या आकाशाखाली मोकळा श्वास घेत आहे, मला माझ्या जवळच्या व्यक्तीसोबत मोकळ्या आकाशाखाली कॉफीचा स्वाद घ्यायचा आहे, साडे सहा वर्षांचा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. या सहा वर्षांत मी खूप काही गमावले आहे, मला या आठवणी नकोत, असे सांगताना इंद्राणी भावुक झाली होती. पत्रकारांनी तिला खटल्या संदर्भात प्रश्न विचारताच या खटल्या संदर्भात तिने बोलण्यास नकार दिला असून माझ्या वकिलाशी बोलू शकतात, असे तिने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. इंद्राणीने तुरुंगातून बाहेर पडताना केस काळे केले होते व हलकाशा मेकअप केला होता, याबाबत पत्रकारांनी विचारले असता ‘तुरुंगात सर्व काही मिळते, ते विकत घेऊन मी माझा मेकअप केला’, असे इंद्राणी म्हणाली. शेवटी इंद्राणीने ‘मला न्यायव्यवस्थेवर पुरेपूर विश्वास आहे,’ असे बोलून तिने सर्वांचे खास करून वकिलाचे आभार मानले तिने आभार मानले.
Join Our WhatsApp Community