इंद्रायणी नदी प्रदूषण प्रकरणी सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल!

पिंपरी महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांद्वारे कंपन्यांतील रसायनयुक्त सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत सोडल्याचे तपासणीत आढळून आले आहे. या प्रकरणी चिखली परिसरातील सहा कंपन्यांच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या जलनिःसारण विभागातर्फे यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

( हेही वाचा : ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला लेखी युक्तिवाद सादर! काय म्हणाले अनिल देसाई? )

पिंपरी या शहराच्या उत्तर सीमेवरून इंद्रायणी नदी वाहते. तळवडेपासून डुडुळगावपर्यंत आणि आळंदी हद्दीपासून चऱ्होलीपर्यंत नदीची हद्द आहे. चिखलीपासून मोशीपर्यंत नदीच्या परिसरात कंपन्या आहेत. शिवाय, भोसरी ‘एमआयडीसी’तील बहुतांश कंपन्यांचे सांडपाणी नदीकडे प्रवाहित होते. नैसर्गिक नाल्यांद्वारे ते नदीला मिळते. मात्र, काही कंपन्या व लघुउद्योजकांनी कंपन्यांमधील सांडपाणी महापालिकेच्या सांडपाणी वाहिन्यांना जोडल्याचे तपासणी आढळून आले. अशी कंपन्यांना नोटीस देण्यात आल्या. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले.

नाल्यांद्वारे नदीत रंगीत पाणी मिसळत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. त्यानुसार जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन व कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांच्या पथकाने पाहणी केली असता, सहा उद्योजकांनी त्यांच्या कंपन्यांतील सांडपाणी वाहिन्या घरगुती सांडपाणी वाहिन्यांना जोडल्याचे आढळून आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here