अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ (Mahakumbh) मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांसह प्रयागराज येथील त्रिवेणी संगम येथे आरती केली. तसेच स्वतःच्या हातांनी भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले.
याप्रसंगी गौतम अदानी म्हणाले की, प्रयागराज महाकुंभातील (Mahakumbh) अनुभव अद्भुत आहे. येथील व्यवस्थापनासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो. महाकुंभ मेळ्याचे (Mahakumbh) व्यवस्थापन व्यवस्थापन संस्थांसाठी संशोधनाचा विषय आहे. माझ्यासाठी, गंगा मातेच्या आशीर्वादापेक्षा मोठे काहीही नाही असे अदानी म्हणाले. याप्रसंगी गौतम अदानी यांनी भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले. तत्पूर्वी त्यांनी येथील स्वयंपाकघरात देखील प्रसाद बनवण्यासाठी मदत केली आहे.
(हेही वाचा PM Narendra Modi ‘या’ दिवशी महाकुंभमेळ्यामध्ये येऊन अमृतस्नान करणार)
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अदानी ग्रुपने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेसच्या (इस्कॉन) सहकार्याने महाकुंभात प्रसाद वाटप करण्याचा निर्णय घेतला. महाकुंभाच्या (Mahakumbh) शेवटपर्यंत महाप्रसाद सेवा उपलब्ध असेल. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट शेअर करून सांगितले. यावेळी महाकुंभात अदानी यांनी त्यांचा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाची घोषणा केली. आगामी 7 फेब्रवारी रोजी जीतचे लग्न अगदी साधेपणाने आणि संपूर्ण पारंपरिक पद्धतीने होईल, असे अदानी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community