भारतीय उद्योगविश्वात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले, असे उद्योगपती Ratan Naval Tata…

55
भारतीय उद्योगविश्वात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले, असे उद्योगपती Ratan Naval Tata...
भारतीय उद्योगविश्वात ज्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले, असे उद्योगपती Ratan Naval Tata...

रतन नवल टाटा हे भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक होते. १९९१ ते २०१२ सालापर्यंत त्यांनी टाटा ग्रूप्स आणि टाटा सन्सचा कार्यभार अध्यक्ष म्हणून केला आहे. ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१४ या कालावधीत त्यांनी शेवटचं अध्यक्षपद भूषवलं. २००० साली रतन टाटा यांना भारतातला तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर २००९ साली त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला होता. (Ratan Naval Tata)

(हेही वाचा- Boxing Day Test : ऑस्ट्रेलियन मीडियाने टीका केलेल्या विराटला भारतात आणि परदेशातही पाठिंबा, शास्त्रीने ऑस्ट्रेलियन मीडियाला सुनावलं )

रतन टाटा यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथून आर्किटेक्चर या विषयात बॅचलर ही पदवी मिळवली. त्यांनी १९७५ साली हार्वर्ड बिझनेस स्कूल म्हणजेच HBSच्या ऍडव्हान्स मॅनेजमेंट कोर्समध्येही ऍडमिशन घेतलं होतं. पण त्याआधीच त्यांनी १९६२ साली टाटा सन्समध्ये काम करायला सुरुवात केली होती. १९९१ साली जे.आर.डी. टाटा यांच्या निवृत्तीनंतर रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून संपूर्ण कार्यभार सांभाळला. त्यांच्या कार्यकाळामध्ये टाटा ग्रुप्सने मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्रित ग्रुप्समधून टाटा कंपनीला जागतिक स्तरावर कार्यरत करण्यासाठी टेटली, जॅग्वार लँड रोव्हर आणि कोरस हे ब्रँड टेक ओव्हर केले. (Ratan Naval Tata)

रतन टाटा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ४० पेक्षा जास्त बिझनेस स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली. प्रामुख्याने त्यांनी वैयक्तिक क्षमतेच्या जोरावर त्यांच्या फर्म, RNT कॅपिटल ॲडव्हायझर्सद्वारे अतिरिक्त गुंतवणूक केली. (Ratan Naval Tata)

रतन टाटा यांनी लग्न केलं नाही म्हणूनच त्यांना मूलबाळही नव्हतं. रतन टाटा यांना गंभीर अवस्थेत ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या ८६ व्या वर्षी ९ ऑक्टोबर २०२४ या दिवशी रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारने आणि झारखंड सरकारने एक दिवसाचा शोक जाहीर केला होता. (Ratan Naval Tata)

(हेही वाचा- Palghar Railway Accident : पालघरमध्ये रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर)

दुसऱ्या दिवशी १० ऑक्टोबरला रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना लष्करी पद्धतीनुसार २१ बंदुकांनी सलामी देण्यात आली. तसंच मुंबई पोलिसांनी औपचारिक गार्ड ऑफ ऑनर दिला आणि त्यांचं पार्थिव भारतीय ध्वजात गुंडाळलं होतं. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात ₹१०,००० कोटी दान केल्याचं लिहिलं होतं. (Ratan Naval Tata)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.