दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलाला यश, पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान

151

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे नियंत्रणरेषा ओलांडून भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या जिहादी दहशतवाद्याला भारतीय सैन्याने ठार केले. त्यामुळे दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे.

(हेही वाचा – Recession 2022: जागतिक स्तरावर ‘ही’ कंपनी 4,000 कर्मचाऱ्यांना काढणार!)

यासंदर्भातील माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळील करनाह सेक्टरजवळ झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांची एक टोळी मंगळवारी सीमा सशस्त्र दलाची नजर चूकवून नियंत्रण रेषा ओलंडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र भारतीय लष्कराच्या जवानांना काही हालचाल आढळली. दहशतवाद्यांची टोळी भारतात घुसखोरीचा प्रयत्नात असल्याचे आढळून आले. या टोळीतील दोन दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात यश देखील मिळाले. सशस्त्र दलाने केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला तर दुसरा दहशतवादी फरार आहे.

दुसऱ्या दहशतवाद्याला शोधण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडील मोठ्या प्रमाणात दारू गोळा होता. तो जप्त करण्यात आला आहे. सर्च ऑपरेशन सुरू आहे.काही दहशतवादी टोळ्या घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. या घटनेने त्याची सत्यताही समोर आली आहे. सीमा भागात जवानांना हायअलर्ट देण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.