पेट्रोल वाचवण्याच्या या भन्नाट टिप्स तुम्हाला माहिती आहेत का?

109

सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल- डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ईलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधनाला पर्याय उपलब्ध झाला आहे. पण अजूनही या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर नसल्याने, अजून तरी इंधनाला काही पर्याय नाही.

पेट्रोलचे दर कमी करणे आपल्या हातात नसले, तरी पेट्रोल वाचवणे शक्य आहे. त्यामुळे पेट्रोल वाचवण्याच्या काही भन्नाट टिप्स आपण जाणून घेऊया.

हवेचा दाब योग्य असावा

गाडी चालवत असताना, टायर आणि रस्ते यांच्यातील घर्षणाचा परिणाम गाडीच्या वेगावर होतो आणि परिणामी इंधनाच्या वापरावर होतो. त्यात चाकांमधील हवेचा दाब कमी असल्यास, अधिक पृष्ठभाग रस्त्याला घासला जातो आणि गाडीला अधिक इंधनाची गरज पडते. त्यामुळे हवेचा दबाव योग्य राखणे आवश्यक आहे.

( हेही वाचा: आता बेस्टमध्येही करता येणार रिझर्व्हेशन )

गाडीमध्ये अधिक वजन असल्यास

गाडीमध्ये अधिक सामान असल्यास, वजनाने इंधनाचा वापर सुद्धा अधिक वाढतो. त्यामुळेच जेवढे सामानाचे वजन वाढेल तेवढे इंधन अधिक खर्च होते. त्यामुळे बाहेर फिरायला जाताना या गोष्टीचे भान ठेवा.

गाडीचा वेग जास्तही नको, कमीही नको

गाडीचा वेग शंभरच्या पुढे असल्यास, इंधनाच्या वापरात 10 टक्क्यांनी वाढ होते. हाच वेग जर आणखी वाढला, तर इंधनाचा वापर 25 टक्क्यांहून अधिक वाढू शकतो. तसेच, जर तुम्ही गाडी कमी वेगाने चालवत असाल तर अधिक इंधनाचा वापर होतो.

ऍक्सिलरेशन थोडे दमाने

गाडीचा वेग वाढवण्यासाठी ऍक्सिलरेशन करत असताना, अधिक इंधनाचा वापर केला जातो. गाडी जितकी अधिक ऍक्सिलरेट कराल तेवढा पेट्रोलचा अधिक वापर होतो. त्यामुळे गरज नसताना वेग वाढवणे म्हणजे खिसा हलका करणे होय.

( हेही वाचा: तुम्ही घेतलेल्या लसीचा प्रभाव अजूनही आहे का? )

ट्रॅफिकचा अंदाज घ्या

गाडी चालवताना, ट्रॅफिकचा अंदाज घेणे गरजेचे आहे. तुमच्या पुढे असणा-या गाडीपासून अंतर राखणे, इतर वाहनचालक आणि पादचारी नेमके काय करत आहेत यावर बारीक नजर ठेवणे, यामुळे ब्रेकचा वापर कमी होतो आणि त्याने इंधनाची बचत होते.

ब्रेक पॅडलरचा वापर जरा नीट करा

ब्रेक पॅडलर तर अधिक ताकदीने किंवा जोर लावून ब्रेक पॅडलरचा वापर केल्यास, त्याचा गाडीच्या एॅव्हरेजवर विपरीत परिणाम होतो.

नियमित सर्व्हिसिंग

नियमितपणे गाडीचे सर्व्हिसिंग करणे तुमच्या गाडीचे एॅव्हरेज वाढवण्यासाठी आवश्यक आहे. गाडीचे इंजिन चांगल्या पद्धतीने काम करत असेल, तर कमीतकमी इंधनाचा वापर करुन अधिकाधिक उत्तम परफाॅर्मन्स मिळणे शक्य असते.

( हेही वाचा: काॅल रेकाॅर्ड करताय? तर हे जाणून घ्या… )

वेगाने गाडी चालवताना एसीचा वापर

वेगाने गाडी चालवत असताना, गाडीच्या काचा उघड्या ठेवणे, तुमचे अधिक इंधन जाळणारे ठरु शकते. 80 किमी प्रतितास किंवा त्याहून अधिक वेगाने गाडी चालवत असाल आणि गाडीच्या काचा बंद असतील तर तुमच्या इंधनाची बचत होण्याची शक्यता अधिक असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.