शहाबुद्दीन राठोड (Shahabuddin Rathod) यांचा जन्म ८ डिसेंबर १९३७ रोजी गुजरातमधील थांगड येथे झाला. त्यांचा जन्म गुजराती मुस्लिम कुटुंबात झाला. शहाबुद्दीन राठोड (Shahabuddin Rathod) हे गुजराती विद्वान, शिक्षक आणि विनोदी लेखक आहेत. १९५८ ते १९७१ पर्यंत ते शिक्षक म्हणून काम करत होते आणि १९७१ ते १९९६ पर्यंत ते शाळेचे मुख्याध्यापक होते. (Shahabuddin Rathod)
राठोड (Shahabuddin Rathod) यांची पार्श्वभूमी जरी इस्लामची असली तरी त्यांना संस्कृत भाषेचे चांगले ज्ञान आहे आणि हिंदू धर्माचा देखील त्यांचा अभ्यास आहे. मारे क्या लखावू हातू?, हसता-हसावता, अनमोल अतिथ्या, सज्जन मित्रोना संगते, दुखी ठावनी कला, शो मस्ट गो ऑन, लाख रुपियानी वाट, मारो गधेडो देखय छे?, हस्यानो वरघोडो ही त्यांनी लिहिलेली विनोदी पुस्तके आहेत. (Shahabuddin Rathod)
(हेही वाचा – Lionel Messi : लिओनेल मेस्सीच टाईम्सचा वर्षातील सर्वोत्तम ॲथलीट)
त्यांनी (Shahabuddin Rathod) हिंदीमध्ये १ आणि गुजरातीमध्ये एकूण १० पुस्तके लिहिली आहेत. पापड पोल-शहाबुद्दीन राठोड की रंगीन दुनिया ही टेलिव्हिजन विनोदी मालिका त्यांच्या लेखनावर आधारित होती. तसेच शहाबुद्दीन राठोडनो हस्यानो वरघोडो अशा चित्रपटांमध्येही त्यांच्या लेखनाचा वापर करण्यात आला आहे. २०२० मध्ये त्यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Shahabuddin Rathod)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community