नाशिकच्या महामार्गावरील जखमी बिबट्या सापडला, पण…

पुणे-नाशिक महामार्गावर वाहनाला धडक दिल्यामुळे जखमी झालेल्या बिबट्याला शोधण्यात अखेर वनविभागाला वीस तासांच्या शोध मोहिमेनंतर यश आले. मंगळवार, 21 जून रोजी संगमनेर येथील चंदनापूरी घाट भागातील डोंगराळ भागातील एका पाईपलाईनमध्ये बिबट्या आढळून आला. संध्याकाळी बिबट्याला पाईपलाईनमधून बाहेर काढण्यासाठी  वनविभागाने विशेष ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

बिबट्याला पाइपलाइनमधून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन राबवणार

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर बिबट्या चारचाकी वाहनाच्या खाली आला, त्यामुळे त्वचा फाटली. गाडीच्या बोनेटखाली बिबटया आल्यानंतर चालकानेही गाडी थांबवली. अपघातामुळे धास्तावलेल्या बिबट्याने कशीबशी सुटका करत पळ काढला. हा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला. बिबट्याचा व्हिडिओ व्हायरल होताच संगमेश्वर वनविभाग इको-एको फाऊंडेशन आणि वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्टकडून रात्रभर बिबट्याला शोधले. मात्र अंधारामुळे बिबट्याला शोधण्यास अपयश आले. व्हिडिओच्या आधारावर गुगल सर्चचा आधार घेत संगमेश्वर येथील चंदनापूरी घाटातील जागा वनविभागाने शोधली. सकाळी वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन सेंटरने बिबट्या शोधण्यासाठी कुत्र्यांची मदत घेतली. कुत्रे जवळ येत असल्याचे दिसून येताच डोंगराळ भागांतील पाईपलाईनमध्ये बिबट्या आढळून आला. तब्बल आठ तासांच्या शोधमोहिमेनंतर बिबट्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आढळला. अंधारात बिबट्याला बाहेर काढणे जिकरीचे असल्याने बुधवारी, 22 जून रोजी सकाळी बिबट्याला पाईपलाईनमधून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन राबवले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here