पुणे- बंगळूर महामार्गावर इनोव्हाचा भीषण अपघात; दोन महिला जागीच ठार

107

पुणे- बंगळूर महामार्गावर साता-यातील खंबाटकी बोगद्याजवळ गोकर्ण महाबळेश्वर वरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृ्त्यू झालेल्या महिलांची नावे आहेत तर कारमधील इतर 6 जण जखमी झाले आहेत.

सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यालगत असणा-या कठड्याला धडकली. गाडीचा वेग एवढा भरधाव होता की गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात पुण्यातील सराफा व्यावसायिक कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित सहा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: सोलापूरमध्ये रेडिमेड गारमेंट्सच्या कारखान्याला भीषण आग; 2 कारखाने जळून खाक )

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु

 

या अपघाताची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली असून, तत्काळ जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.