सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ बनवून पोस्ट करणं हा तरूणांमध्ये चांगलाच ट्रेंड सुरू आहे. मात्र सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या व्हिडिओमुळे एखाद्याला तरूंगाची वारी देखील करावी लागते, याचं उदाहरण पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळालं आहे. इन्स्टाग्रामवर अश्लील भाषा आणि धमकीचे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या तरूणींना पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. या प्रकरणी साक्षी हेमंत श्रीश्रीमल, कुणाल कांबळे आणि साक्षी राकेश कश्यप अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
असा आहे प्रकरण
‘थेरगाव क्वीन’ नावाने साक्षी श्रीश्रीमल हिचे इंस्टाग्रामवर अकाऊंट असून, त्यावर तिच्या मित्र आणि मैत्रिणीसह अश्लील भाषेतील, धमकीचे व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली आहे. गुन्हा दाखल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साक्षी श्रीश्रीमल हिचे इंस्टाग्रामवर थेरगाव क्वीन नावाचे अकाऊंट आहे.
(हेही वाचा – आदित्य ठाकरे युवराज पेंग्विन, तर शेलार आणि भातखळकरांना गुजरात पेंग्विन म्हणायच का? )
त्यावर, संबंधित आरोपी साक्षी श्रीश्रीमल, साक्षी कश्यप आणि कुणाल कांबळे हे अत्यंत अश्लील भाषेत आणि धमकीचा व्हिडिओ बनवून ते इंस्टाग्रामवर पोस्ट करत असल्याची माहिती आणि त्यांचा व्हिडिओ वाकड पोलिसांना मिळाला होता. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी तरुणींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञानासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community