महाराष्ट्रातील ‘हा’ रेल्वेमार्ग करताना 24 हजार कामगारांनी गमावला हाेता जीव

महाराष्ट्राची ओळख असणा-या सह्याद्री पर्वतरांगांतून डोंगर कापून रस्ते तयार करणे किंवा रेल्वेमार्ग बांधणे हे एक मोठे आव्हान होते. कठीण पाषाणातून रस्ते तयार करणे हे सोपे नाही. ह्या दरम्यान अनेक अपघात झाले. घाटातून बांधण्यात आलेला हा रेल्वेमार्ग म्हणजे सिव्हिल इंजिनियरिंगचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो.

या रेल्वेमार्गासाठी भोर घाटात म्हणजेच आताच्या खंडाळा घाटात तसेच, थाल घाट म्हणजेच कल्याण व इगतपुरी दरम्यान रेल्वे ट्रॅक बांधण्यात आले. या घाटांमध्ये रेल्वेमार्ग बांधताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले, याची सगळी माहिती जर्नल ऑफ रेल्वे हिस्ट्रीमध्ये प्रकाशित झाली आहे. १८६३ काम सुरू झालेल्या या 174 किलोमीटरचा रेल्वेमार्ग बनवण्यासाठी तब्बल 24 हजार कामगारांना आपले प्राण गमवावे लागले होते.

…म्हणून 24 हजार मजूरांना गमवावे लागले प्राण

अतिशय तीव्र चढण, जंगली श्वापद, मोठमोठाले डोंगर, हजारो फूट खोल द-या असा एकूण भूभाग जेथे चालणंही कठीण होतं तिथे लोहमार्ग टाकण्याचे अवघड काम हाती घेण्यात आले. या घाटांत रेल्वेमार्ग करण्यासाठी जवळजवळ 45 हजार मजूर, तंत्रज्ञ नेमण्यात आले. मालवाहतूक करणा-या बैलगाड्यांची संख्यांच जवळजवळ 10 हजार होती. अतिशय दुर्गम प्रदेश, प्रचंड पाऊस, कोसळणा-या दरडी, वाहून जाणारे भूभाग, रोगराई, पडणारे कष्ट, जंगली श्वापदं, कोसळणा-या दरडींखाली चिरडले जाणे, खोल द-यांमध्ये कोसळून होणारे मृत्यू, तसेच वेळेवर पोहचू न शकणारे धान्य त्यामुळे होणारी उपासमार, तसेच वेळेवर न मिळणारी वैद्यकीय सुविधा यामुळे या घाटातून रेल्वेमार्ग बनवण्यासाठी तब्बल 24 हजार कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता. या घाटांतील लोहमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी फार मोठ्या मनुष्यहानीची किंमत मोजावी लागली.

भोर घाट आणि थाल घाट या प्रदेशांत रेल्वेमार्ग बांधण्यासाठी जवळजवळ 10 वर्षे लागली. या मार्गाचे काम सुरु असताना, एकावेळी 25 हजार कामगार पर्वतरांगामध्ये काम करत असत.

( हेही वाचा: घाटी लोकांना क्रिकेटमधले काय कळते? या एका वाक्यावरुन झाला ‘वानखेडे स्टेडिअम’चा जन्म )

अभ्यासक आणि जेष्ठ अधिका-यांचे मत

जर्नल ऑफ रेल्वे हिस्ट्री या जर्नलमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबामधील जेष्ठ अभ्यासक आणि भारतीय रेल्वेमधील एक महत्त्वाचे अधिकारी इयन केर यांचाही लेख प्रसिद्ध झाला आहे. ते म्हणतात…

“भोर घाटातील रेल्वेचा ट्रॅक बांधण्याची संकल्पना आणि बांधकाम ही मृत्यू, संघर्ष, सहनशक्ती, वीरता, धैर्य आणि हे सगळे दोन दशकांपर्यंत सहन करत शेवटी मिळवलेला विजय या सर्वांची लार्जर दॅन लाईफ कथा आहे.”

“या कथेचे हिरो हे त्या ठिकाणी काम केलेले पुरुष, महिला आणि लहान मुले हेच आहेत, कारण त्यांनीच सर्वात जास्त काम केले आहे. तसेच, या दरम्यान झालेल्या विविध अपघातांमध्ये पंचवीस हजार पेक्षाही जास्त कामगारांचा जीव गेला आहे.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here