फक्त अर्धा तास आधी भारत पोहोचला आणि पाकिस्तानचा धुव्वा उडाला! काय झालं नेमकं?

187

लक्षद्वीप… भारताच्या पश्चिमेला असलेल्या अरबी समुद्रातील एक सुंदर असं बेट. भारताच्या नौदल सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा हे बेट फार महत्वाचं आहे. या बेटावरचं निसर्गसौंदर्य तर मनाला भुरळ घालणारंच आहे. नावाप्रमाणे हे बेट लाखात एक आहे. पण या बेटाचा इतिहास खूपच रंजक आणि थरारक आहे. पाकिस्तानच्या केवळ अर्धा तास आधी भारताने या बेटावर तिरंगा फडकावला आणि पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

(हेही वाचाः तो जेवायला जाताना पाकीट विसरला, म्हणून Credit Card चा जन्म झाला)

जिनाह यांचा डाव

1947 मध्ये फाळणीनंतर भारतापासून पाकिस्तान वेगळा करण्यात आला. त्यावेळी ज्याठिकाणी मुस्लिम बहुसंख्य होते तो प्रत्येक प्रांत महम्मद अली जिनाह यांना पाकिस्तानसोबत जोडायचा होता. लक्षद्वीप बेटावर 90 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकांची वस्ती होती, म्हणून जिनाह यांचा लक्षद्वीपवर डोळा होता. त्यामुळे पाकिस्तानचा झेंडा फडकावून हे बेट काबीज करण्याचा डाव जिनाह यांनी आखला. त्यासाठी जिनाह यांनी पाकिस्तानचं एक जहाज लक्षद्वीपच्या दिशेने पाठवलं.

New Project 16 1
लक्षद्वीप बेटावरील मिनिकॉयचा समुद्र किनारा

(हेही वाचाः EPFO Interest Rate: PF च्या व्याजदरात 43 वर्षांतील सर्वात मोठी घसरण)

याची खबर भारताचे तत्कालीन गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना लागली. त्यावेळी पटेल हे संस्थानांमध्ये विखुरलेल्या भारताला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होते.

sardar patel 9
सरदार वल्लभभाई पटेल

(हेही वाचाः मराठमोळ्या माणसाच्या सहीमुळे पाकिस्तानात नोटांना ‘किंमत’ होती, बघा कशी होती नोट)

पाकिस्तान लक्षद्वीपवर ताबा मिळवण्यासाठी जहाज पाठवत असल्याचं कळताच, पटेल यांनी तामिळनाडूतील मुदलियार ब्रदर्सना एक संदेश पाठवून तातडीने भारतीय नौदलाच्या जहाजाला लक्षद्वीपच्या दिशेने कूच करण्यास सांगितले. काहीही करुन पाकिस्तानचं जहाज पोहोचण्याआधी लक्षद्वीपवर भारतीय झेंडा फडकणं महत्वाचं होतं. त्याप्रमाणे समयसूचकता दाखवत नौदलाच्या जहाजाने लक्षद्वीपवर तिरंगा फडकावला आणि लक्षद्वीप बेट भारताचे अविभाज्य भाग बनले.

New Project 13 1
ए.रामास्वामी मुदलियार आणि ए.लक्ष्मणस्वामी मुदलियार

(हेही वाचाः IRCTC Rules:ट्रेनच्या प्रवासाला आता विमानाचा नियम, इतक्याच वजनाचं लगेज फ्रीमध्ये नेता येणार)

ज्यावेळी भारताने लक्षद्वीप आपल्या ताब्यात घेतलं, त्याच्या बरोबर अर्ध्या तासाने पाकिस्तानचं जहाज लक्षद्वीपच्या दिशेनं आलं होतं. पण भारताच्या तिरंग्यापुढे पाकिस्तानचा चांद-तारा फिका पडला आणि पाकिस्तानी जहाजाने लक्षद्वीपच्या वेशीवरुनच पळ काढला.

New Project 15 1
अग्गाटी एअरपोर्ट

जर त्यावेळी भारताने लक्षद्वीप गमावलं असतं तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पाकिस्तानने चीनच्या सहाय्याने मोठं नाविक तळ निर्माण केलं असतं. ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असता. त्यामुळेच लक्षद्वीपवर मिळवलेला हा विजय जरी सहज वाटत असला, तरी त्याला फार मोठं ऐतिहासिक महत्व आहे. या विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या मन की बातमध्ये गौरवोद्गार काढले आहेत.

New Project 14

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.