उत्तर कोरिया मागच्या काही दिवसांपासून क्षेपणास्त्र चाचणी करत आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरियाच्या शेजारचे देश अधिक सतर्क झाले आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास उत्तर कोरियाने जपानवरुन क्षेपणास्त्र डागले. यानंतर जपानमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला. धोक्याचा अलार्म वाजल्यानंतर जपानी नागरिकांनी भूमिगत ठिकाणी आसरा घेतला. तर देशातील उत्तर भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.
उत्तर कोरियाने मागील 10 दिवसांत पाचवे क्षेपणास्त्र डागले. जपानसह दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने पाणबुडीविरोधी सराव केला. त्यानंतर उत्तर कोरियाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र पॅसिफिक महासागरात कोसळण्यापूर्वी जपानच्या भूभागावरुन गेले. त्यामुळे जपानमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सायरन वाजल्याचा आवाज ऐकू येत आहे. रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. जपान सरकारने उत्तर कोरियाच्या या कृत्याचा निषेध केला आहे.
WATCH: Sirens wailed across Japan as people were told to seek shelter for a North Korean missile launch; the threat has now passed pic.twitter.com/6nCpZuebCk
— BNO News (@BNONews) October 3, 2022
( हेही वाचा: एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात अयोध्येतील महंत )
सातत्याने क्षेपणास्त्र डागणे ही एक हिंसक कृती
जपानचे पंतप्रधान किशीदा यांनी या क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, एक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आपल्या देशाच्या भूभागावरुन जात पॅसिफिक महासागरात कोसळले. सातत्याने क्षेपणास्त्र डागणे ही एक हिंसक कृती असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community