International Children’s Book Day : बालदोस्तांनो… तुम्हाला माहितीय, का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन?

या दिवशी मोठमोठे लेखक पोस्टर आणि घोषणांच्या माध्यमातून मुलांना संदेश देण्याचा प्रयत्न करतात. या दिवशी काही शाळांमध्येही बालसाहित्याला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. यासोबतच पालकांनीही मुलांमध्ये पुस्तकाची आवड निर्माण व्हावी म्हणून विशेष प्रयत्न करायला हवेत.

275
World Book Day : जागतिक पुस्तक आणि कॉपिराईट दिन साजरा करण्यामागे कोणती उद्दिष्टे आहेत? वाचा सविस्तर

१९६७ पासून इंटरनॅशनल बोर्ड ऑन बुक्स फॉर यंग पीपलद्वारे दरवर्षी २ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन आयोजित केला जातो. IBBY ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे, या संस्थेचा उद्देश वाचनाची आवड निर्माण करणे आणि मुलांच्या पुस्तकांकडे लक्ष वेधणे हे आहे. लेखक Hans Christian Anderson यांच्या जन्मदिनी जागतिक बाल पुस्तक दिन साजरा केला जातो. (International Children’s Book Day)

The Emperor’s New Clothes, The Little Mermaid, The Nightingale, The Snow Queen, The Ugly Duckling, The Little Match Girl, Thumbelina अशा अनेक पुस्तकांचं लेखन Hans Christian Anderson यांनी केले आहे. The Little Mermaid ही Anderson यांची गोष्ट तर मुलांमध्ये खूपच प्रचलित आहे. खरंतर लहान मुलांच्या पुस्तकांना चालना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अनेकानेक बालसाहित्य निर्माण झाले पाहिजेत आणि मुलांचं भावविश्व सुदृढ रहावं, याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. (International Children’s Book Day)

(हेही वाचा – Dhairyasheel Mane : … तोपर्यंत प्रचार करणार नाही; संजय पाटील धैर्यशील मानेंचा प्रचार केव्हा करणार ?)

या दिवशी मोठमोठे लेखक पोस्टर आणि घोषणांच्या माध्यमातून मुलांना संदेश देण्याचा प्रयत्न करतात. या दिवशी काही शाळांमध्येही बालसाहित्याला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. यासोबतच पालकांनीही मुलांमध्ये पुस्तकाची आवड निर्माण व्हावी म्हणून विशेष प्रयत्न करायला हवेत. अधिकाधिक बालसाहित्य निर्माण व्हावे, यासाठी प्रकाशकांनीही प्रयत्न करायला हवेत. बालसाहित्यात द्वेष असता कामा नये. संस्कार आणि आनंद हा लहान मुलांचा बौद्धिक खाऊ आहे, हे विसरता कामा नये. (International Children’s Book Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.