हिंदू, हिंदू धर्म, संस्कृती आणि हिंदुत्व या शब्दांची ऍलर्जी असलेल्या डाव्या विचारांचे, नक्षली विचारांचे असेच तथाकथित पुरोगामी विचारांची मंडळी आता जागतिक पातळीवर संघटित झाली आहेत. तसेच या सर्व हिंदुद्वेष्ट्यांनी जागतिक स्तरावरून हिंदुत्वाच्या विचाराचे उच्चाटन करण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यासाठी १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या विषयावर जागतिक पातळीवर ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सुदैवाने या हिंदुविरोधी कारस्थानाला तेवढ्याच पातळीवरून विरोध होऊ लागला आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनीही या परिषदेच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
काय आहे ही परिषद?
‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या नावे एक जागतिक स्तरावर व्यासपीठ उभारण्यात आले आहे. याच नावाने ही परिषद होणार आहे. त्यासाठी मागील १५ दिवसांपासून सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा पद्धतशीरपणे वापर करून या परिषदेचा प्रचारप्रसार सुरु आहे. तसेच अधिकाधिक जणांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या परिषदेचे अमेरिकेतील ४० नामवंत विद्यापीठे हे सहप्रायोजक बनले आहेत. त्यामध्ये कोलंबिया विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, न्यू यॉर्क, चिकागो, कॅलिफोर्निया विद्यापीठ अशा विद्यापीठांचा समावेश आहे. त्याच बरोबर ८०० हुन अधिक उच्च शिक्षितांनी याला पाठिंबा दिला आहे. या परिषदेचे आयोजन करणाऱ्यांमध्ये नक्षली, डावे–साम्यवादी, सामाजिक कार्यकर्ते, ख्रिस्ती, मुस्लिम विचारवंत, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आदी समाजघटकांचा समावेश आहे.
https://twitter.com/dghconference/status/1426564508357648392?s=20
(हेही वाचा : आजादी का अमृत महोत्सव : केंद्राच्या ‘या’ खात्याकडून वीर सावरकरांचा सन्मान!)
१० ते १२ सप्टेंबरच का?
सध्या अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या दहशतीची चर्चा जगभर सुरु आहे. याचे मूळ हे ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत तालिबान्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आहे. त्याला २० वर्षे पूर्ण होणार आहेत. तालिबान्यांची दहशत पुन्हा अफगाणिस्तानात सुरु झाली आहे. अशा वेळी येत्या ११ सप्टेंबर रोजी पुन्हा तालिबानी दहशतवादावर चर्चा होईल. ती होऊ नये आणि ‘हिंदू दहशतवाद’ असा विषय चर्चेला यावा याकरता मुद्दाम हिंदुत्वाला टार्गेट करण्यात आले आहे आणि म्हणून या परिषदेचे आयोजन नेमके १० ते १२ सप्टेंबर या दरम्यान करण्यात आले आहे, असा सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता चेतन राजहंस यांचा आरोप आहे.
The agenda of the #DismantlingGlobalHindutva is anti-Hindu. The organizers want to portray Hindutva as terrorist, racist & sexist in nature. @SanatanSanstha opposes this Conference & appeals to the Govt of India to prevent this Conf. from taking place #DGH_Panelists_Hindu_Haters pic.twitter.com/kKfaxXfzEI
— Chetan Rajhans (@1chetanrajhans) September 1, 2021
कोण आहेत या परिषदेचे वक्ते?
- औद्रे ट्रशके (audrey truschke) – ‘स्टुडंट अगेन्स्ट हिंदुत्व आयडॉलॉजी’ संघटनेच्या सल्लागार समितीची सदस्या, अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पार्टी या पक्षातील प्रमुख पदाधिकारी.
- आनंद पटवर्धन – स्वयंघोषित मानवाधिकार कार्यकर्ता, डॉक्युमेंटरी फिल्म मेकर
- आयेशा किडवाई – डाव्या विचारांची कार्यकर्ती, जेएनयु विद्यापीठातील प्राध्यापक
- बानू सुब्रह्मण्यम – मँचेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक
- भंवर मेघवंशी – पत्रकार आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता
- क्रिस्टोफे जाफ्रीलोट (Christophe Jaffrelot) – डाव्या विचारांचे स्तंभलेखक
- कविता कृष्णनन – सीपीआय एम-एल पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या
- मीना खंडासमी – आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ती
- नंदिनी सुंदर – प्राध्यापक – दिल्ली स्कुल ऑफ इकॉनॉमिक, ‘दि वायर’ संकेतस्थळाचे संपादक सिद्धार्थ वरदराजन यांची पत्नी
- नेहा दीक्षित – ‘दि वायर’ च्या पत्रकार
(हेही वाचा : २१व्या शतकातील खिलाफत चळवळ आणि ‘खलिफा’!)
कुणी केला विरोध?
- १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता देश-विदेशांतून हिंदुत्वनिष्ठांनी #DGH_Panelists_Hindu_Haters या ‘हॅशटॅग’चा वापर करून ‘ट्विटर’च्या माध्यमातून मोहीम राबवली. जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या तासात भारतात प्रथम क्रमांकावर आला. यामध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम, आयर्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस, संयुक्त अरब अमिरात, जपान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधील हिंदूंनी या ऑनलाईन आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हिंदूंनी हातात ‘प्ला-कार्ड’ (हस्तफलक) धरून स्वतःची छायाचित्रे अथवा व्हिडिओ अपलोड करत आंतरराष्ट्रीय परिषदेचा निषेध केला. ही परिषद रद्द करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे प्रशासनाला प्रत्यक्ष निवेदने देण्यात आली.
When they can’t show blatant hate, they organize academic conferences.
The real purpose of ‘Dismantling Global Hindutva’. Watch and share!
#DGH_Panelists_Hindu_Haters pic.twitter.com/Cz7uLocnWz
— Akanksha Shandilya (@Youngndharmic) September 1, 2021
- हिंदु जनजागृती समितीने तिच्या संकेतस्थळावरून या हिंदुविरोधी कार्यक्रमाद्वारे होणारे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी ‘ऑनलाईन हस्ताक्षर अभियान’ चालू केले आहे. ऑनलाईन याचिकेची (‘पिटीशन’ची) लिंक : https://www.HinduJagruti.org/protest-dgh
DISMANTLING GLOBAL HINDUTVA ?
Is it a big conspiracy against Hinduism ?
Hindus need to be more vigilant
Unite to dismantle this Hinduphobic event !
Sign the Petition 👇🏻!https://t.co/3CEXCJdzPy
– Hindu Janajagruti Samiti@CoHNAOfficial #Dismantle_DGH_conference pic.twitter.com/UQog9PDKIN
— HJS Karnataka (@HJSKarnataka) August 31, 2021
- हिंदू अमेरिकन फाऊंडेशन या संस्थेने ऑनलाईन मोहीम सुरु केली आहे. या परिषदेला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेतील विद्यापीठे आणि विचारवंतांना पत्रे पाठवून त्यांना या परिषदेपासून परावृत्त करत आहे. तसेच जागरूक हिंदूंना संबंधितांशी पत्र व्यवहार करण्यासाठी उद्युक्त करत आहे. तसेच ऑनलाईन याचिका केली आहे.
Join Our WhatsApp CommunityWe’ve sent follow up letters to the 41 universities initially listed as sponsoring the upcoming Dismantling Global Hindutva conference & you’ve sent more than 900k emails! Well done! https://t.co/YHdXtm706I
— Hindu American Foundation (@HinduAmerican) August 27, 2021