आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन (International Holocaust Remembrance Day) हा होलोकॉस्ट येथे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ पाळला जातो. दुसर्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीकडून ज्यूंवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. नाझी जर्मनी हे ज्यू विरोधी होते. जग पादक्रांत करण्यासाठी हिटलर ओळखला जात असला तरी ज्यूचा संहार ही देखील महत्वाची ओळख होती.
हिटलर ज्यूंच्या विरोधात का होता, याचे ठोस उदाहरण अथवा पुरावा सापडत नाही. ख्रिस्ती लोकही ज्यूंच्या विरोधात होते. त्यांनी देखील ज्यूंवर पुष्कळ अत्याचार केले आहेत. मात्र हिटलर हा ज्यूंच्या संहारासाठी ओळखला जातो. दुसर्या महायुद्धापूर्वी युरोपातील ९० लाख ज्यूंपैकी दोन तृतीयांश म्हणजे सुमारे ६० लाख ज्यू होलोकॉस्ट हत्याकांडात बळी (International Holocaust Remembrance Day) पडले.
होलोकॉस्ट येथे नाझी लोकांनी छळछावणी उभारली होती. दुसर्या महायुद्धापूर्वी नाझी जर्मनीचे शुद्धिकरण करण्यासाठी अशुद्ध वर्नातल्या लोकांचा नाश करावा यासाठी हिटलरने ज्यूंचा संहार केला. त्यांना अटक करुन होलोकॉस्ट येथे ठेवण्यात आले. ही नाझींची सर्वात मोठी छळछावणी होती. येथे ज्यूंवर माणुसकीला लाजवेल असे अत्याचार करण्यात आले.
यामध्ये लोकांना मारण्यासाठी मोठ्या बंदिस्त खोलीत विषारी वायू सोडून त्यांना मारले जायचे किंवा जिवंत जाळले जायचे. २७ जानेवारी हा दिवस ज्यूंच्या नरसंहाराचा स्मरण दिवस म्हणून पाळला जातो. २००५ पासून संयुक्त राष्ट्राने हा दिवस पाळण्याची घोषणा केली.
Join Our WhatsApp Community