१८ डिसेंबर १९९० साली जनरल असेंम्बलीने जगभरातले सर्व स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं म्हणून आंतरराष्ट्रीय अधिवेशनाच्या वेळी एक ठराव स्वीकारला होता.
दरवर्षी १८ डिसेंबर या दिवशी संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM)’ या एजन्सीद्वारे, ४१ दशलक्षपेक्षा जास्त अंतर्गत विस्थापित व्यक्तींसोबत अंदाजे २७२ दशलक्ष स्थलांतरित लोकांनी स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबियांच्या हक्कासाठी बऱ्याच आव्हानांचा सामना केला होता. त्यांनी दिलेलं हे योगदान अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन (International Migrants Day) साजरा करण्याची सुरुवात केली.
(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : जसप्रीत बुमराह भारताचा ऑस्ट्रेलियातील सगळ्यात यशस्वी गोलंदाज)
हा जागतिक कार्यक्रम IOM च्या जवळपास ५०० देशांतल्या कार्यालये आणि उप-कार्यालये तसंच सरकारी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत असलेल्या नागरी समाजाद्वारे आयोजित केला जातो. या कार्यक्रमांमध्ये स्थलांतरित होण्यासाठी कायद्यानुसार मार्गदर्शन, स्थलांतर थीम, सामाजिक सामंजस्य, प्रतिष्ठा, शोषण, एकता यांचं परीक्षण केलं जातं. तसंच स्थलांतर केल्यानंतर स्थलांतरितांना आणि समाजाला फायदा होण्यासाठी हे परीक्षण करतात.
१९९७ साली फिलिपिनो आणि आशिया खंडातल्या इतर स्थलांतरित संस्थांनी १८ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करायला, तसंच त्याचा प्रचार करायला सुरुवात केली. १८ डिसेंबर १९९० साली संयुक्त राष्ट्रांनी सर्व स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय अधिवेशनात जागतिक स्थलांतरित दिनाचा स्वीकार केला, म्हणून दरवर्षी याच दिनांकाला हा दिवस साजरा केला जातो.
(हेही वाचा – Thane Gold theft: ठाण्यातील दागिन्यांच्या दुकानात चोरी; 6.5 किलो सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले)
जागतिक स्थलांतरित दिवसाची (International Migrants Day) संयुक्त राष्ट्रांची घोषणा करणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या दिवशी स्थलांतरित झालेल्या लोकांच्या संरक्षणाशी संबंधित असलेला एक विशिष्ट मुद्दा अधोरेखित केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी सर्व सदस्य देशांना, सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांना मानवी हक्क आणि स्थलांतरितांच्या मूलभूत स्वातंत्र्याविषयी माहिती प्रदान करून स्थलांतरित झालेल्या लोकांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याकरिता आमंत्रित केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिनाकडे लाखो स्थलांतरित लोकांनी त्यांच्या यजमान आणि मूळ देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या मूलभूत मानवी हक्कांबद्दल विचार केला जावा, यासाठी केलेल्या योगदानाची जाणीव ठेवण्यासाठी एक संधी म्हणून पाहिलं जातं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community