#International Mount Everest day: जगातील सर्वोच्च शिखर सर करत इतिहास घडवणारे ते दोघे माहिती आहेत का?

184

29 मे हा दिवस देशाच्या आणि जगाच्या इतिहासात खूप महत्त्वाचा आहे. 29 मे 1953 रोजी सकाळी 11.30 वाजता दोघांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले. दरवर्षी जगभरातून हजारो लोक माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर चढण्याचा प्रयत्न करतात. काही यशस्वी देखील झाले आहेत, परंतु या सर्वोच्च शिखराला दोन लोकांनी  29 मे 1953 रोजी पहिल्यांदा स्पर्श केला. न्यूझीलंडच्या एडमंड हिलरी आणि नेपाळच्या शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी एव्हरेस्ट सर केले.

New Project 2022 05 27T163058.286

ही मोहिम ब्रिटनने सुरु केली होती आणि या मोहिमेच्या यशाची माहिती 2 जूनला जगाला सांगण्यात आली होती. या मोहिमेच्या यशानंतर, 29 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय माउंट एव्हरेस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो.

( हेही वाचा: गुन्हेगाराला ‘गुंडा’ का बोलतात माहितीय का? वाचा ‘गुंडा’ या शब्दाच्या उत्पत्तीची भन्नाट जन्मकथा )

एडमंड हिलरी यांच्याविषयी

एडमंड हिलरी यांचा जन्म 20 जुलै 1919 मध्ये न्यूझीलंडमध्ये झाला. 1935 मध्ये जेव्हा हिलरी शाळेच्या गिर्यारोहण संघात सामील झाले, तेव्हा एक दुर्बल दिसणाऱ्या विद्यार्थ्याकडे इतकी प्रबळ इच्छाशक्ती असेल, असे वाटले नव्हते. हिलरी यांनी न्यूझीलंडची शिखरे चढून आपल्या गिर्यारोहणाच्या छंदाची सुरुवात केली आणि त्यानंतर हिमालयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. हिमालय पर्वत रांगेतील 20,000 फुटांहून अधिक उंचीची 11 विविध शिखरे सर करून त्यांनी प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला. हिलरी 1951 मध्ये एव्हरेस्ट शोध मोहिमेतील सदस्य म्हणून सहभागी झाले होते. त्यानंतर 29 मे 1953 रोजी समुद्रसपाटीपासून 29,028 फूट उंच शिखर माऊंट एव्हरेस्टला स्पर्श करत ते गिर्यारोहण क्षेत्रातील कालपुरुष बनले.

New Project 2022 05 27T165115.484
सर एडमण्ड हिलेरी

शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्याविषयी

शेर्पा तेनझिंग नोर्गे यांचा जन्म 1914 ला नेपाळमध्ये झाला. लहानपणी, तेनझिंगने एव्हरेस्टच्या दक्षिणेकडील प्रदेशातील शेर्पा (नेपाळी लोक गिर्यारोहणात कुशल, सहसा पोर्टर) यांचे घर सोडल्यानंतर ते भारताच्या पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगला पळून गेले. ते 1935 मध्ये सर एरिक शिप्टनच्या एव्हरेस्ट सर्वेक्षण मोहिमेत कुली म्हणून सामील झाले. पुढील काही वर्षांमध्ये, त्यांनी इतर गिर्यारोहकांपेक्षा जास्त एव्हरेस्ट मोहिमांमध्ये भाग घेतला. 1952 मध्ये, स्विस गिर्यारोहकांनी दक्षिण मार्गाने एव्हरेस्टवर चढाई करण्याचे दोन प्रयत्न केले, दोन्ही मोहिमांमध्ये तेनझिंग त्यांच्यासोबत होते. 1953 मध्ये, ते सरदार म्हणून ब्रिटीश एव्हरेस्टच्या मोहिमेवर गेले आणि त्यांनी हिलरीसोबत सर्वोच्च शिखर सर केले. या यशानंतर, त्यांना अनेक नेपाळी आणि भारतीय लोक एक अनसंग हिरो मानतात.

New Project 2022 05 27T164959.635
शेर्पा तेनझिंग नोर्गे

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.