चीनमध्ये वस्तूंच्या विक्रीत प्रचंड नरमाई आल्याने, मंदी जाणवू लागली आहे. विक्री मंदावल्यामुळे कंपन्यांना उत्पादनात कपात करावी लागली आहे. इतकच नाही तर, आता चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांमध्येही कपात केली जात आहे. चीनची बलाढ्य तंत्रज्ञान कंपनी अलीबाबाने सुमारे 10 हजार कर्मचा-यांना नोकरीवरुन काढले आहे.
जुनच्या तिमाहीत अलीबाबाच्या हांग्जो स्थित प्रकल्पातून 9 हजार 241 कर्मचा-यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. जूनला संपलेल्या सहामाहीत कंपनीने 13 हजार 616 कर्मचा-यांना कामावरुन काढले आहे. 2016 नंतर कंपनीच्या कर्मचा-यांत पहिल्यांदाच घसरण झाली. सरकारी दबावामुळे चीनचे अब्जाधीश जॅक मा हे अॅंट समूहावरील आपले नियंत्रण सोडण्याची योजना बनवत आहे.
( हेही वाचा: सांगलीत पुराचा धोका: कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ,नदीकाठच्या लोकांचे स्थलांतर )
50 उत्पन्नामध्ये झाली घट
जूनच्या तिमाहीत अलीबाबाच्या उत्पन्नात 50 टक्के म्हणजेच 22.74 अब्ज युआन (3.4 अब्ज डाॅलर) घसरण झाली आहे. गेल्यावर्षी समान अवधीत कंपनीचे उत्पन्न 45.14 अब्ज युआन होते. चीनमधील व्यावसायिक घडामोडींत मोठी घट झाली असून, त्याचा फटका बसत आहे.
Join Our WhatsApp Community