भूतान आणि सिक्कीम ही राज्ये ब्रिटीश काळात स्वतंत्र होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, सिक्कीम भारतात विलीन झालं परंतु भूतान भारताचा हिस्सा बनू शकला नाही. भूतान भारताचा हिस्सा का बनू शकला नाही? त्याची कारणे काय होती? ते पाहूया.
भारत आणि भूतान 1730 मध्ये पहिल्यांदा आमनेसामने आले. 1730 मध्ये बंगालच्या कुंजविहारमध्ये मुघलांनी हमला केला. कुंजविहारची सीमा भूतानला लागत असल्याने, बंगालने भूतानकडे मदत मागितली. भूतानने कुंजविहारची मदत केली आणि मुघल सैन्याला पराभूत केले. परंतु त्या बदल्यात नेपाळने कुंजविहारवर ताबा मिळवला. 1772 मध्ये कुंजविहारमध्ये सत्तेसाठी पुन्हा एकदा लढाई झाली आणि ब्रिटीश सरकारने कुंजविहार ताब्यात घेतले.
1910 मध्ये चीनने तिब्बतवर हल्ला केला. चीन इतक्यावरच थांबलं नाही. चीनने नेपाळ, सिक्कीम आणि भूतानवरही आपला दावा ठोकला. चीनच्या अधिपत्याखाली जायचे नसल्याने, भूतानने ब्रिटीश सरकारशी करार केला. या करारानुसार, ब्रिटीश सरकार भूतानला सुरक्षा देईल, तसेच भूतानच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल देणार नाही.
त्यानंतर 1946 मध्ये जेव्हा भारताच्या स्वांतत्र्याचे वारे वाहू लागले होते. तेव्हा पुन्हा एकदा भूतानचा प्रश्न समोर आला. 1946 च्या संविधान सभेत जवाहरलाल नेहरु यांनी भूतान आणि सिक्कीम यांच्या स्वांतत्र्याचाही प्रश्न मांडला. त्यावेळी नेहरु म्हणाले की, भविष्यात भूतान भारताशी जवळीक वाढवणार असेल, तर त्याचे स्वागत आहे. यावेळी भूतानने स्पष्ट केले की, इतर राज्यांपेक्षा आमची संस्कृती वेगळी आहे. तसेच, 1910 मध्ये ब्रिटीशांशी झालेल्या कराराचीही आठवण करुन दिली. भूतानने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये कोणीही ढवळाढवळ करु नये, असे स्पष्ट केले. तसेच, भारतीय कॅबीनेटला एक पत्रही भूतानकडून पाठवण्यात आले. या पत्रानुसार, भूतान भारताचे राज्य नाही. भूतानच्या सीमा तिब्बत आणि भारताला लागून आहेत. त्यामुळे आमचे दोन्ही देशांशी संबंध आहेत. परंतु, आमचा धर्म आणि संस्कृती चीन आणि तिब्बतसारखी आहे. या पत्रानंतर, जवाहरलाल नेहरु यांनी भूतानचे स्वातंत्र्य मान्य केले.
भूतान आणि भारतामध्ये फेब्रुवारी 1948 मध्ये एका करारावर स्वाक्ष-या झाल्या, त्यानुसार जशी परिस्थिती आहे तसेच चालू देण्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर त्याच वर्षी एप्रिलमध्ये नेहरु यांनी भूतानला बैठकीसाठी बोलावले. या बैठकीनंतर नेहरु यांनी भूतानला दोन पर्याय दिले. यानुसार भूतानला भारतात विलीन व्हायचे होते किंवा दुस-या पर्यायानुसार भूतानने भारतासोबत एक करार करावा, त्या करारानुसार, भूतानचे संरक्षण, दळणवळण आणि आंतरराष्ट्रीय संबंध भारताला सोपवावे, परंतु भूतानचा या कराराला विरोध होता.
( हेही वाचा: आता ऑफीसमध्येही काढू शकता डुलकी; पण आहे ‘ही’ अट )
त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली आणि 9 ऑगस्ट 1949 ला दोन्ही देशांमध्ये एक करार झाला. या करारानुसार, भारताने भूतानला सुरक्षा देत, एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. याचाच अर्थ असा की, भूतानचे परराष्ट्र व्यवहार भारत सांभाळणार. 1954 मध्ये जवाहलाल नेहरु यांनी भूतानचा राजा जिग्मे दोरजू वांगचूकला प्रजासत्ताक दिनी बोलावले. त्यानंतर 1958 मध्ये जवाहरलाल नेहरु भूतानच्या भेटीला गेले आणि त्यानंतर भारत आणि भूतानचे संबंध अधिक घट्ट होत गेले. 2007 मध्ये जुना करार रद्द करत भारताने भूतानला परराष्ट्र व्यवहारांसंबंधीदेखील स्वांतत्रता दिली.
Join Our WhatsApp Community