‘आर्या वाळवेकर’ हिने जिंकला ‘मिस इंडिया यूएसए’ चा किताब

व्हर्जिनीया इथल्या (Virginia) भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकर हिने यावर्षी मिस इंडिया यूएसए 2022 चा किताब पटकावला आहे. 18 वर्षीय आर्याला न्यू जर्सी इथे पार पडलेल्या वार्षिक स्पर्धेत मिस इंडिया यूएसए 2022 चा किताब मिळाला. सौंदर्यस्पर्धेंचे विजेतेपद पटकावल्यानंतर, अभिनेत्री बनण्याची आकांक्षा बाळगणारी आर्या म्हणाली, स्वत:ला मोठ्या पडद्यावर पाहणे, चित्रपट किंवा टेलिव्हिजनमध्ये काम करणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. या सौंदर्यस्पर्धेत व्हर्जिनिया विद्यापीठाची विद्यार्थिनी सौम्या शर्मा ही दुस-या क्रमांकावर होती. तर न्यू जर्सीची संजना चेकुरी तिस-या क्रमांकावर होती.

( हेही वाचा: Maharashtra TET Scam: टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या मुलांची प्रमाणपत्रे रद्द; सत्तार म्हणतात… )

यावर्षी या स्पर्धेचा 40 वा वर्धापन दिन असून, भारताबाहेर आयोजित करण्यात येणारी ही सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय विजेतेपद स्पर्धा आहे. वर्ल्डवाईड पेजेंट्सच्या बॅनरखाली ही स्पर्धा प्रथम न्यूयाॅर्कमधील भारतीय- अमेरिकन धर्मात्मा आणि नीलम सरन यांनी आयोजित केली होती. गेल्या काही वर्षांत जगभरातील भारतीय समुदायाकडून मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे, अशी प्रतिक्रिया धर्मात्मा सरन यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here