कोणाला मुर्ख बनवत आहात? पाकसोबतच्या संबंधांवरून भारताने अमेरिकेला सुनावले

71

पाकिस्तानला एफ-16 विमानांसाठी देण्यात आलेल्या आर्थिक मदतीवरुन भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी खडे बोल सुनावले. एस जयशंकर यांनी रविवारी वाॅशिंग्टनमध्ये भारतीय अमेरिकी समुदायासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना अमेरिकेने पाकिस्तानला एफ-16 विमानांच्या ताफ्यासाठी 450 दशलक्ष डाॅलर्सचे पॅकेज दिल्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर एस जयशंकर यांनी अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध असे आहेत की ज्यातून ना पाकिस्तानला फायदा होत आहे, ना अमेरिकेचे हित होत आहे, असे म्हटले.

एस जयशंकर काय म्हणाले? 

एकीकडे दहशतवादविरोधी कारवाई करण्यासाठी आपण हे करत आहोत असे सांगायचे आणि दुसरीकडे एफ-16 सारखी लढाऊ विमाने कुठे आणि कशासाठी दिली जात आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. अशा गोष्टी सांगून तुम्ही इतरांना मुर्ख बनवू शकत नाही , अशी टीका एस जयशंकर यांनी केली.

( हेही वाचा: ‘प्राध्यापकांचे पगार आम्ही देऊ, तुम्ही महाविद्यालयांची फी कमी करा’, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे आवाहन )

अमेरिकेचे प्रत्युत्तर

आम्ही पाकिस्तान आणि भारतासोबत असणा-या संबंधांची तुलना करत नाही. दोघेही वेगवेगळ्या मुद्यांवर आमचे भागीदार आहेत, असे गृहविभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी पत्रकार परिषदेत बोलाताना सांगितले. आम्ही दोघांकडेही आमचे भागीदार म्हणून पाहतो, कारण अनेक बाबतीत आमच्यात सामायिक मूल्ये आहेत. अनेक मुद्यांवर आमचे हेतूही समान आहेत. भारत आणि पाकिस्तानसोबत असणा-या संबंधांना स्वत: चा आधार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.