इरानमध्ये शिया तीर्थस्थळावर दहशतवादी हल्ला; 15 जणांचा मृत्यू तर 40 जखमी

145

ईरानमधील शिराज शहरामध्ये तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून, 40 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे. एकाचा अद्याप शोध सुरु आहे.

शिराज शहरातील शिया तिर्थावर तीन बंदूकधा-या दहशतवाद्यांनी हल्ला केला. शिया तीर्थस्थळावर मोठ्या प्रमाणात भाविक आले होते, त्यावेळी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबीर केला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. बंदूकधा-यांनी अचानक गोळीबार केल्यामुळे भाविक आणि उपस्थितांमध्ये भीतीचे वातारवण निर्माण झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

( हेही वाचा: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेसेवा ठप्प )

या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर काही ठिकाणी मृतांची संख्या 15 सांगितली जात आहे तर काही स्थानिकांनी या हल्ल्यात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.