…तर तिसरे महायुद्ध अटळ, युक्रेनचा नाटोमध्ये समावेश करण्यावरुन रशियाचा इशारा

165

युक्रेनला अमेरिकेच्या नेतृत्त्वाखील नाटो अटलांटिक ट्रिटी लष्करी युतीमध्ये प्रवेश दिल्यास तिसरे महायुद्ध अटळ असल्याचा इशारा रशियाने दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे नाटोने मात्र रशियाने अण्वस्त्रांच्या वापरापासून दूर रहावे, असे आवाहन केले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यानी 30 सप्टेंबर युक्रेनच्या 18 टक्के भागाच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा केल्यानंतर काही तासांनंतर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी नाटोकडे सदस्यत्व त्वरित मिळावे यासाठी दावा दाखल केला आहे. अशा पावलांमुळे तिस-या महायुद्धाचा भडका उडेल हे युक्रेनला चांगलेच माहित आहे, असे रशियाचे म्हणणे आहे.

( हेही वाचा: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण )

सुरक्षा परिषदेचे उपसचिव वेनोडिक्टोव्ह यांच्या मते युक्रेनचा नाटोच्या सदस्यत्वाचा अर्ज हा दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, कारण पश्चिमेकडील देशांना नाटोच्या युक्रेनियन सदस्यत्वाचे परिणाम समजले आहेत. पुतीन यांनी नाटोच्या पूर्वेकडील विस्तारासाठी, विशेषत: युक्रेन आणि जाॅर्जिया यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांवर वारंवार टीका केली आहे. 21 सप्टेंबर रोजी पुतीन यांनी रशियाच्या संरक्षणासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा इशारा दिला होता.

बेलारुसचा इशारा

रशियाचा मित्र बेलारुसनेही रशियाने दिलेल्या महायुद्धाच्या धमकीची री.. ओढली आहे. जगभरात ठिकठिकाणी सैन्य तैनात केल्याने जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असा इशारा बेलारुसचे नेते अलेक्झांडर लुकाशेनको यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.