आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन (International Nurses Day) म्हणजे नर्स दिन दरवर्षी १२ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या वाढदिवशी साजरा केला जातो. १८२० मध्ये जन्मलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक नर्सिंगचे संस्थापक मानले जाते. परिचारिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. (International Nurses Day)
आजारी लोकांच्या उपचारात डॉक्टरांना पूर्ण सहकार्य करतात आणि कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या लोकांच्या उपचारातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘नर्सेस डे’ साजरा करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम ‘डोरोथी सदरलँड’ या अमेरिकेच्या आरोग्य, शिक्षण आणि कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने मांडला होता. पुढे अमेरिकेचे अध्यक्ष डी.डी. आयझेनहॉवर यांनी हा दिवस साजरा करण्यास मान्यता दिली. (International Nurses Day)
हा दिवस १९५३ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेने १९६५ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. सन १९७४ मध्ये परिचारिका व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या “फ्लोरेन्स नाइटिंगेल” यांचा जन्मदिवस म्हणून १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. (International Nurses Day)
हा दिवस सर्व परिचारिकांसाठी कौतुकाचा दिवस आहे. त्यांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. नर्सिंग हा जगातील सर्वात मोठा आरोग्य व्यवसाय मानला जातो. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्तरांसारख्या सर्व पैलूंद्वारे रुग्णाची काळजी घेण्यासाठी परिचारिका प्रशिक्षित, शिक्षित आणि अनुभवी असायला पाहिजेत. (International Nurses Day)
या दिवसाचे निमित्त साधून भारत सरकारच्या कुटुंब आणि कल्याण मंत्रालयाने परिचारिकांच्या प्रशंसनीय कार्य आणि धैर्यासाठी त्यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देण्यास सुरूवात केली आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार दरवर्षी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जातो. हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जातो ५०,००० रुपये रोख, सन्मानपत्र आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप असते. (International Nurses Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community