असं म्हटलं जातं की ऍथलेटिक खेळाचा उगम प्राचीन ग्रीसमध्ये झाला. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ऍथलेटिक खेळाचे पुन्हा नव्याने आयोजन सुरु झाले. यास आपण आता ऑलिम्पिक म्हणजे. १९७० पूर्वी हे खेळ केवळ हौस म्हणून खेळले जायचे, यास आंतरराष्ट्रीय मान्यता नव्हती. पण १९८० च्या दशकात व्यावसायिक खेळ म्हणून याकडे पाहिले गेले. (International Olympic Day)
प्राचीन ऑलिम्पिक खेळांमध्ये अनेक खेळांचा समावेश होतो. उन्हाळी खेलात काही वेळा ३२ वेगवेगळ्या खेळांचा समावेश करण्यात आला. १९२४ मध्ये हिवाळी खेळांना मान्यता देण्यात आली. ऑलिम्पिक खेळ ही जगातील आघाडीची क्रीडा स्पर्धा मानली जाते. (International Olympic Day)
(हेही वाचा- Ghatkopar Hoarding दुर्घटना प्रकरणात आयपीएस अधिकारी यांची पत्नी संशयाच्या भोवऱ्यात)
पहिला ऑलिम्पिक दिवस २३ जून १९४८ रोजी साजरा करण्यात आला. पोर्तुगाल, ग्रीस, ऑस्ट्रिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, उरुग्वे, व्हेनेझुएला आणि बेल्जियम यांनी आपापल्या देशात ऑलिम्पिक दिवस साजरे केले. ऑलिम्पिक चार्टरच्या १९७८ च्या आवृत्तीत, आयओसी ने प्रथम शिफारस केली की सर्व एनओसी ने ऑलिम्पिक मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक दिवस आयोजित करावा. (International Olympic Day)
२३ जून १९४८ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा (International Olympic Day) करण्यास सुरुवात झाली. पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक खेळांचे आयोजन १८९६ मध्ये करण्यात आले होते, परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना २३ जून १८९४ रोजी पियरे डी कौबर्टिन यांनी केली होती. २३ जून रोजी संस्थेची स्थापना झाली म्हणून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे दरवर्षी ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. (International Olympic Day)
(हेही वाचा- Nirmala Sitharaman: GST परिषदेच्या बैठकीत पाच मोठे निर्णय; ‘प्लॅटफॉर्म तिकिटासह…’)
ऑलिम्पिक दिन विविध प्रकारे साजरा केला जातो, जसे की खेळ आणि धावण्याची शर्यत, क्रीडा, क्रीडा मेळे, क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा दौरे. खेळांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी लोक या दिवशी विविध खेळ आणि शारीरिक क्रियाकलापांमध्ये भाग घेतात. याशिवाय शाळा, महाविद्यालये, क्रीडा संघटना आणि ऑलिम्पिक संघटना स्थानिक पातळीवर कार्यक्रम आयोजित करतात. (International Olympic Day)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community