व्हीजेटीआय महाविद्यालयात ‘स्थापत्य २०२२’ या आंतरराष्ट्रीय टेक्निकल फेस्टिव्हलला सुरूवात!

119

व्हीजेटीआय महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या (CESA) वतीने आंतरराष्ट्रीय टेक्निकल फेस्ट ‘स्थापत्य २०२२’ चे २३ व २४ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २३ एप्रिलला सकाळी १० वाजता ‘स्थापत्य २०२२’ या फेस्टला सुरूवात झाली. व्हीजेटीआय महाविद्यालयाच्या सभागृहात प्रमुख पाहुणे शांतीलाल जैन यांचे आगमन झाल्यावर, त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली.

कौशल्य, कल्पना त्यांची बुद्धिमत्ता दाखवण्याची उत्तम संधी

सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनचे (Civil Engineering Student Association) अध्यक्ष ( chairperson) प्राध्यापक विकास वरेकर यांनी उपस्थितांना या फेस्टव्हलची विस्तृत माहिती दिली. “आम्ही स्थापत्यला स्पर्धा न म्हणता फेस्ट म्हणतो कारण दिवाळी, न्यू इयर सारखा हा आमचा फेस्टिव्हल आहे.” असे सांगत त्यांनी उपस्थितांना Happy Civil Engineering Day अशा शुभेच्छा दिल्या. स्थापत्य २०२२ मध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य, कल्पना त्यांची बुद्धिमत्ता दाखवण्याची उत्तम संधी आहे. असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

यानंतर विभागप्रमुख पी.पी. भावे यांनी संपूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनचे या फेस्टिव्हलचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले, तर प्राध्यापक ए.एन.बांभोळे आणि प्राध्यापक सांगोळे यांनी अशा फेस्टिव्हलमार्फतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळतो तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही मदत हवी असल्यास आम्ही कायम सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले.

सगळ्यात शेवटी प्रमुख पाहुणे शांतीलाल जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्यामुळे मी सतत इथे येत जात असतो. येथील सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांना कायम सहकार्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही स्वत: पुढाकार घेऊन विविध स्पर्धांमध्ये कायम सहभाग घेतला हवा. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत जेव्हा अशा स्पर्धांमध्ये सहभाद घ्याल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता असे त्यांनी सांगितले. आमच्या काळात व्हीजेटीआयचा विद्यार्थी आहे म्हणून कोणीही लगेच नोकरी देत असे परंतु सद्यस्थितीत तुम्हाला स्वत:ला सिद्ध केल्याशिवाय काहीही सहज मिळणार नाही त्यामुळे प्रयत्न करत रहा… महाविद्यालय व प्राध्यापक कायम तुमच्या पाठीशी आहेत असे सांगत त्यांनी उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विश्वास निर्माण केला.

यानंतर मयुरी वक्ते यांनी आभार मानत स्वागत समारंभ कार्यक्रमाची सांगता केली आणि मूळ स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धांचा निकाल रविवार २४ एप्रिल २०२२ लागेल. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सहभागींना या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलचे सहभाग प्रमाणपत्र मिळेल. या फेस्टिव्हलसाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’ मीडिया पार्टनर आहे. मागील वर्षी देशातील विविध आयआयटी, एनआयटी आणि कॅनडा, दक्षिण आफ्रिका या देशांमधून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

विविध स्पर्धा 

  • M³ 🏠
  • ब्रिज मॅनिया🌉
  • क्लॅश ऑफ काँक्रीट ◻️
  • Quizzie Buzzie❓
  • पेपर टेक्नोव्हेशन📄
  • टाउन-ओ-प्लॅनर 🌆
  • CAD कॉम्बॅट👩‍💻
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.