वरळीत या फिरायला; होणार आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुल!

110

वरळीतील दुग्धशाळेचा भूखंड आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन संकुल आणि मत्स्यालयाच्या निर्मितीसाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे. वरळी डेअरी सुमारे १४ एकरमध्ये पसरलेली असून या जागेवरील आरे महाव्यस्थापकांचे कार्यालय आणि दुग्धशाळा गोरेगाव येथील आरे कॉलनीत स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

( हेही वाचा : “मातोश्री’ला वाचवण्यासाठी स्वत:च्या आईचे नाव…” सोमय्यांचा गंभीर आरोप! )

आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुल आणि मस्त्यालय

या संपूर्ण १४.५५ एकरमध्ये ०.७ एकरावर प्रशासकीय इमारत व आयुक्त कार्यालय, ०.९ एकरात वर्ग ३ कर्मचारी निवासस्थाने, तर २.८ एकरात वर्ग ४ कर्मचारी निवासस्थाने आहेत. हा एकूण ४.५ एकरचा परिसर वगळून उरलेला १०.०७ एकराचा भूखंड आंतरराष्ट्रीय पर्यटन संकुल आणि मस्त्यालय उभारण्यासाठी वापरला जाणार आहे आणि दुग्धशाळा आता आरे वसाहतीमध्ये स्थलांतरीत केली जाणार आहे.

जागतिक दर्जाचे मत्स्यालय

वरळी दुग्धशाळेतील सर्व यंत्रसामग्री गोरेगावमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी राज्य सरकारने एजन्सी नियुक्त करावी आणि विनाविलंब स्थलांतराची कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश दुग्धविकास आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच या वरळी डेअरीच्या जागेवर पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील बँकॉक येथील सिअ‍ॅम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभे केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.