International Women’s Day 2023: महिला जागतिक दिनानिमित्त गूगलचं खास डूडल

गुगल नेहमीच विशेष दिवसांसाठी डुडल तयार करत असतं. आज जागतिक महिला दिवस आहे. याचेच औचित्य साधत गुगलने एक खास डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांचा गौरव करण्यात आला आहे. जाणून घ्या गुगलच्या या खास डूडलबद्दल.

विविध क्षेत्रात काम करणा-या महिलांचा गौरव

जागतिक महिला दिन हा दिवस जागतिक स्तरावर दरवर्षी 8 मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. यानिमित्ताने गुगलकडून खास डूडल तयार करण्यात आले आहे. या डूडलमध्ये एक महिला भाषण करताना दिसत आहे तर काही महिला या आंदोलनात सहत्रागी झालेल्या दिसत आहे. ग्रह, ता-यांचे निरिक्षण करणा-या महिलादेखील या डूडलमध्ये दिसत आहेत. ज्येष्ठ महिला तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी महिलादेखील या डूडलमध्ये दिसत आहे. या डूडलवर क्लिक केल्यानंतर स्क्रिनवर महिलांचे हात दिसतील. या हातात निळ्या आणि जांभळ्या रंगाचे झेंडे दिसतात.

( हेही वाचा: Women’s Day 2023 : महिलांना १ रुपयात मिळणार सॅनिटरी पॅड्स! काय आहे केंद्र सरकारची योजना? )

गुगल डूडल आर्टिस्टने व्यक्त केल्या भावना

जागितक महिला दिनाचे हे गुगल डूडल आर्टिस्ट, अॅलिसा विनान्सद्वारे डिझाईन करण्यात आले आहे. अॅलिसा विमान्सने डूडलबद्दलची भावनादेखील व्यक्त केली. तिने यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या डुडलबाबत सांगितले की, आमची यावर्षीची डूडलची थिम ही ‘वुमन सपोर्टिंग वुमन’ ही आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here