International Women’s Day : मेट्रो वुमन ते कोस्टल वुमन

1025
International Women’s Day : मेट्रो वुमन ते कोस्टल वुमन
  • सचिन धानजी

सनदी अधिकारी आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो वुमन. कासवगतीने सुरु असलेल्या या प्रकल्पाला त्यांनी गतिशीलता प्राप्त करून दिली, त्यामुळे आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांना माध्यमांनी नव्हेतर अधिकाऱ्यांसह जनतेनंही मेट्रो वुमन ही पदवी बहाल केली. आज आश्विनी भिडे यांची जशी मेट्रो वुमन अशी ओळख आहे तशीच आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे कोस्टल रोड वुमन. (International Women’s Day)

सनदी अधिकारी आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो वुमन. अभियंता म्हणून त्यांनी कोणतेही शिक्षण घेतले नाही. परंतु प्रशासनाचा अनुभव गाठिशी असल्याने त्यांनी मुंबई मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जो काही म्हणून प्रयत्न केला, त्याची इतिहासात नोंद असेल. कासवगतीने सुरु असलेल्या या प्रकल्पाला त्यांनी गतिशीलता प्राप्त करून दिली, त्यामुळे आश्विनी भिडे यांना माध्यमांनी नव्हेतर अधिकाऱ्यांसह जनतेनंही मेट्रो वुमन ही पदवी बहाल केली. आज आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची जशी मेट्रो वुमन अशी ओळख आहे तशीच आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे कोस्टल रोड वुमन. महापालिकेच्यावतीने हाती घेतलेल्या प्रिन्सेस स्ट्रिट ते वरळी या सागरी किनारा मार्ग प्रकल्प अर्थात कोस्टल रोडचे काम संथ गतीने सुरु होतं, तिथं आश्विनी भिडे यांनी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारली आणि मेट्रोच्या अनुभवाचा फायदा घेत मावळ्याच्या माध्यमातून भूमिगत कामाला गती दिली. त्यामुळे आज कोस्टल रोड नियोजित वेळेत लोकांसाठी खुला होऊ शकला. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मध्ये येणाऱ्यांना त्या आडनावाप्रमाणेच भिडल्या. (International Women’s Day)

(हेही वाचा – Budget Session 2025: राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.३ टक्के वाढ अपेक्षित; आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतो? वाचा   )

आश्विनी भिडे (Ashwini Bhide) हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना पाणी पुरवठ्यापासून रस्ते बांधकामापर्यंत आणि शिक्षणापासून ते स्वच्छतेपर्यंत आणि मेट्रो रेल्वेपासून ते कोस्टल रोडपर्यंत काम करताना स्वत:ला सिद्धच केलं नाहीतर आजच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही अशाप्रकारच्या प्रकल्पांची कामे लिलया पार पाडू शकतात हे दाखवून दिलं. त्यामुळे आश्विनी भिडे यांनी केलेले काम तमाम महिला वर्गांसाठी एक प्रेरणाच नाही तर आदर्श ठरणारं आहे. आश्विनी भिडे (Ashwini Bhide) या १९९५ च्या महाराष्ट्र कॅडरच्या सनदी अधिकारी आहेत. मूळ गाव सांगली असलेल्या भिडे यांची प्रशासकीय कारकिर्द ही कोल्हापूरपासून सुरु झाली. १९९७ ते ९९ या काळात त्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. त्यानंतर नागपूरमध्येही त्यांनी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी-सीईओ म्हणून काम केलं. नागपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ असताना त्यांनी ३१० गावांमध्ये ४३४ धरणे बांधून सात हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. २००८ मध्ये आश्विनी भिडे या मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात अर्थात एमएमआरडीए मध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या देखरेखीखाली सध्याचा पूर्वमुक्त मार्ग अर्थात इस्टर्न फ्री वे आणि सहार एलिव्हेटेड ऍक्सेसोड तसेच मिठी नदीची स्वच्छता अशा अनेक प्रकल्पांना दिशा देवून ती कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. (International Women’s Day)

राज्यात २०१४ मध्ये महायुतीचे सरकार येऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपले मेट्रो रेल्वेचे स्वप्न साकारण्यासाठी २०१५ मध्ये भिडे (Ashwini Bhide) यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली. एमएमआरडीएच्या अखत्यारित येणारा हा केवळ एक विभाग होता. जेव्हा भिडे यांनी या पदाचा भार स्वीकारला होता, तेव्हा याचे एक साधे स्वतंत्र कार्यालयही नव्हते. कार्यालयापासून याची सुरुवात होती. कार्यालयापासून ते पुढे प्रकल्पासाठी लागणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची निवड करत आज त्यांनी मुंबई मेट्रोची एक स्वतंत्र व्यवस्था तथा यंत्रणा उभी केली. भिडे नावारुपाला आल्या त्या मेट्रोच्या आरेमधील कारशेडच्या बांधकामावरून. मेट्रोचे कारशेड आरेमध्येच व्हावे यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली आणि यामध्ये बाधित होणाऱ्या झाडांची कापणी करून त्याऐवजी अन्यत्र झाडे लावणे आणि कापण्याजोगी नसतील ती झाडे पुनर्रोपणाच्या माध्यमातून जगवणे यासाठी त्यांचा प्रयत्न होता. परंतु आरेतील ही झाडे कापण्यास जोरदार विरोध झाला. राजकीय पक्षांनी विरोध केला, पर्यावरणवादी म्हणवणाऱ्या संस्थांनी विरोध केला. परंतु यात मोठे राजकारण होते आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रकल्प ज्या सुसाट गतीने सुरु होता, त्याला कुठे तरी खिळ बसवायची याच हेतूने हा सर्व विरोध होता. मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला हलवल्यास प्रकल्पाचा खर्चही वाढणार होता आणि कांजूरमधील जागेचा तिढा अधिक असल्याने ती जागा ताब्यात मिळण्यास अधिक विलंब होईल अशाप्रकारची भावना भिडे वारंवार बोलून दाखवायच्या. आरेतील झाडं तोडू देणार नाही अशी पर्यावरणवादी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका असतानाच न्यायालयाच्या आदेशानंतर कारशेडच्या बांधकामातील बाधित झाडे रात्रीच्या अंधारात कापण्यात आली. तब्बल २ हजारांहून अधिक झाडं कापण्यात आली होती. त्यावेळी मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून भिडे (Ashwini Bhide) यांच्यावर टीका झाली आणि या वादामुळे भिडे आणि उबाठा शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्यात जोरदार मतभेद झाले. (International Women’s Day)

(हेही वाचा – Maharashtra Economic Survey : २०२६ मध्ये ६० वर्षांवरील महिलांची संख्या वाढणार !)

२०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार आले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी भिडे (Ashwini Bhide) यांची मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन उचलबांगडी केली. परंतु मार्च २०२० मध्ये जेव्हा कोविडची लाट आली तेव्हा नियतीने ठाकरे सरकारला भिडे (Ashwini Bhide) यांना मुंबई महापालिकेत कोविडसंदर्भातील समन्वयक म्हणून पाठवण्याचा निर्णय घ्यावा लावला. त्यानंतर महापालिकेत त्यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करून अपमानित करण्याचा ठाकरेंचा डाव होता आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्याकडे कोणत्याही ठोस खात्यांची जबाबदारी न देता त्यांना वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न केला. त्यातच पुढे मग त्यांच्याकडे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात येणाऱ्या कोस्टल रोडची जबाबदारी सोपवली. यातही ठाकरे यांचा स्वार्थ होता. त्यांना हटवून मेट्रोची गती कमी होती आणि आता कोस्टल रोडची गती वाढवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली. परंतु एक प्रशासकीय अधिकारी म्हणून भिडे (Ashwini Bhide) यांनी कोस्टल रोडचे काम मेट्रोतील कामांप्रमाणेच अत्यंत मन लावून आणि तन्मयतेने केले. त्यामुळे आज कोस्टल रोड नियोजित वेळेत सर्वांसाठी खुला होऊ शकला. (International Women’s Day)

गिरगावमध्ये जेव्हा मेट्रोला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता, तेव्हा आश्विनी भिडे यांनी स्वत: तिथे जाऊन लोकांना प्रकल्पाचे महत्व पटवून सांगितले. त्यांनी हा प्रकल्प पूर्ण करताना एका कार्यालयात बसून निर्णय घेतलेले नाहीत, तर कधी लोकांमध्ये तर कधी प्रत्येक रेल्वे स्थानके आणि मार्गाची पाहणी करण्यासाठी भुयारी मार्गात शिरुन त्या काम करत होत्या. प्रत्येक कामांची माहिती त्या प्रत्यक्ष जागी जाऊन घेत असल्याने अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती किती खरी, किती खोटी याची त्यांना कल्पना असायची आणि त्यामुळेच अधिकारी कधीही खोटी माहिती देण्याची हिंमत करत नव्हते. हेच होते त्यांचे आपल्या कामाप्रती असलेले प्रेम आणि शंभर टक्के योगदान. त्यामुळे कुलाबा वांद्रे सिप्झ असा मेट्रो ३चा ३३ किलोमीटरचा मार्ग आणि ज्याच्या २७ रेल्वे स्थानकांपैकी २६ रेल्वे स्थानके ही भूमिगत आहेत, ती मेट्रो रेल्वे सेवा येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने आपल्या मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे आज मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल ज्या मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे होतोय, त्या प्रकल्पाला आकार देणारे हात हे आश्विनी भिडे यांचे आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस विराजमान झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिवपदी आश्विनी भिडे यांची नियुक्ती करून घेतली. (International Women’s Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.