स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि ॐ दादर योग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम स्मारकाच्या प्रांगणात शुक्रवार, २१ जून २०२४ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत होणार आहे. (International yoga day)
तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त (International yoga day) जनतेच्या आरोग्याच्या चिकित्सेसाठी रक्त तपासणीचे आयोजन केले आहे. डॉ. अविनाश फडके यांची अत्याधुनिक अॅगिलस (Agilus) रक्त तपसणी प्रयोग शाळा ₹१३००/- शुल्क आकारून CBC, TSH, VITB12, VITD3, CALCIUM, CREATININE, HBA1C, LIPID, SGOT, SGPTच्या चाचण्या केल्या जातील. ही रक्त तपासणी शनिवारी, २२ जून रोजी सकाळी ७.३० ते १०.०० वाजेपर्यंत होईल.
सूचना –
रक्त तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊन नये म्हणून एक फॉर्म भरणे जरूरी आहे. हा फॉर्म सोमवार ते शनिवार, दि. १० जूनपासून योग केंद्रावर सकाळी ७ ते ८.३० या दरम्यान मिळेल. भरलेला फॉर्म शुल्कासह बुधवार, दिनांक १९ जून २०२४ पर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील ॐ दादर योग सेंटरमध्ये सकाळी ७.०० ते ८.३० द्यावा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community