योग दिनानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार सवलतीच्या दरात रक्त चाचण्या! 

दरवर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि ॐ दादर योग सेंटर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांप्रमाणे या वर्षीही स्मारकाच्या प्रांगणात जागतिक योग दिवसाचे आयोजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, २१ जून २०२२ या दिवशी सकाळी ७ ते ९ या कालावधीत असेल. या दिनाच्या निमित्ताने गेली अनेक वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि ॐ दादर योग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने योग वर्गातील साधक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात चालणाऱ्या अनेक उपक्रम कार्यरत सदस्यांच्या आरोग्यासाठी रक्त तापसणी करून घेतली जाते.
ही रक्त तपासणी दादर येथील अविनाश फडके यांच्या रक्त तपासणी केंद्रातर्फे केली जाते. या तपासणी करता अंदाजे ५,५०० रुपये शुल्क आकारले जाते. जागतिक योग दिनानिमित्त डॉ. अविनाश फडके यांची प्रयोगशाळा केवळ १,१०० रुपये आकारणार आहे. ही रक्त चाचणी शनिवार, २५ जून रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे.

या चाचण्या होणार! 

ह्या रक्त तपासणी अंतर्गत Hemoglobin,CBC, ESR, Examination Of Urine, Vitamin D, Vitamin B¬12, Creatinine, HBA1C, LIPID, BUN seruim, Thyroid Function Test, Fasting Suger ह्या चाचण्या केल्या जाणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सर्व उपक्रमात सहभागी होणारे सदस्य आणि त्यांच्या आप्त स्वकियांसाठी ही रक्त तपासणी केली जाणार आहे. या रक्त तपासणीसाठी योग वर्गात सकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत पैसे आधी घेतेले जातील. रक्त तपसणी व्यवस्थित होण्यासाठी सर्व पैसे बुधवार, २२ जुन पूर्वी भरणे जरुरी आहे. या चाचणी करण्यासाठी आधी १२ तास काहीही खाऊ नये, उपवास करावा अन्यथा चाचणी होऊ शकणार नाही, असे कळवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here