यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजेच बुधवार, २१ जून, २०२३ रोजी विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दोन्ही सभागृहाचे आमदार व सुमारे २००० योगप्रेमी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ७ ते ९.०० यावेळेत ‘योगप्रभात @ विधान भवन’ हा कार्यक्रम होईल. यावेळी विशेष अतिथी म्हणून राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी शनिवारी (१७ जून) दिली.
(हेही वाचा – काँग्रेसचा ‘तरुण’ चेहरा झाला ५३ वर्षांचा)
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभेल. तसेच विशेष निमंत्रित म्हणून सर्व मंत्री, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार देखील यावेळी उपस्थित राहतील, असेही मदाने यांनी नमूद केले.
Join us in celebrating International Yoga Day at Vidhan Bhavan along with other dignitaries and embrace India’s ancient tradition of yoga, which promotes health and wellbeing through its transformative practice.
To confirm your participation and make the most of this Yoga Day… pic.twitter.com/xWfZzxJzVU
— Rahul Narwekar (@rahulnarwekar) June 18, 2023
योगविद्या आणि ध्यानधारणा ही आपल्या भारतीय संस्कृतीकडून अखिल विश्वाला लाभलेली अनमोल देणगी आहे. २१ जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून साजरा करण्यात येणे ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद अशी घटना असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार जगातील सर्वच देशांमध्ये या दिवशी सामूहिक योगासनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी योगाचे महत्व अधोरेखित केले जाते. याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम यंदा विधानभवनात आयोजित करण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक सदस्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. योगप्रसार कार्यात उल्लेखनीय योगदान देत असलेल्या शतकमहोत्सवी मुंबईतील कैवल्यधाम या संस्थेचा विशेष सहभाग या उपक्रमासाठी लाभला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community