International Youth Day 2024 : १२ ऑगस्टला का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय युवा दिन?

151
International Youth Day 2024 : १२ ऑगस्टला का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय युवा दिन?
International Youth Day 2024 : १२ ऑगस्टला का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय युवा दिन?

आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day 2024) दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. कोणत्याही देशाचा युवक हा त्या देशाच्या विकासाचा भक्कम आधार असतो, पण तोच तरुण जेव्हा आपल्या सामाजिक आणि राजकीय जबाबदाऱ्या विसरून चैनीच्या कामात आपला वेळ वाया घालवतो तेव्हा तो देश विनाशाकडे वाटचाल करू लागतो. त्यामुळे तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळायला हवे.

आंतरराष्ट्रीय युवा दिन (International Youth Day 2024) साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील तरुणांना जागृत करणे हा आहे, जेणेकरून ते त्यांच्या युवा शक्तीचा योग्य वापर करू शकतील आणि जगाच्या सुंदर भविष्याचा संकल्प साकार करू शकतील. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जगभरात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि एक निश्चित थीम ठरवून तो साजरा केला जातो.

(हेही वाचा – Fake Passport: भारतीय असल्याचा दावा करणारा बांगलादेशी नागरिकाला लखनऊ विमानतळावरून अटक )

२००० मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे (International Youth Day 2024) आयोजन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करणे म्हणजे सरकारने तरुणांच्या समस्यांकडे आणि त्यांच्या मतांकडे लक्ष वेधले पाहिजे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार १९८५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय युवा दिन १२ ऑगस्ट २००० रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने १७ डिसेंबर १९९९ रोजी हा दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. यानंतर, २००० मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला, जो आजपर्यंत दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. (International Youth Day 2024)

सरकार आपल्या देशातील तरुणांसाठी, म्हणजे त्यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षण इत्यादींसाठी जीडीपीचा मोठा वाटा खर्च करतं. तरुणांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय युवा दिन २०२४ ची थीम आहे, “From Clicks To Progress: Youth Digital Pathways For Sustainable Development.” भारताला जगात तरुणांचा देश म्हटले जाते. आपल्या देशात ३५ वर्षांपर्यंतचे ६५ कोटी तरुण आहेत. म्हणजेच आपल्या देशात अफाट मनुष्यबळ उपलब्ध आहे. आज गरज आहे आपल्या देशातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना देशाच्या प्रगतीत भागीदार बनवण्याची, त्यांच्यामध्ये चांगले संस्कार, योग्य शिक्षण आणि तंत्रज्ञांची, त्यांना अंमली पदार्थ, जुगार, यांसारख्या वाईट सवयींपासून वाचवण्याची. चला तर युवा दिनानिमित्त भारताला अधिक सक्षम करुया.. (International Youth Day 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.