आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले कायदेतज्ञ Sivakant Tiwari

162

सिवाकांत तिवारी (Sivakant Tiwari) हे सिंगापूर लीगल सर्व्हिस येथे वरिष्ठ कायदाविषयक अधिकारी होते. त्यांचा जन्म भारतात झाला असला तरी त्यांचे आयुष्य सिंगापूरमध्ये गेले. त्यांचा जन्म २० डिसेंबर १९४५ रोजी भारतात झाला. त्यांचे वडील कारकून होते आणि आई गृहिणी होती. ते तरुण वयातच सिंगापूरला आले आणि त्यांनी मॉंक्स हिल प्रायमरी स्कूल आणि रॅफल्स इन्स्टिट्यूशनमध्ये शिक्षण घेतले.

तिवारी (Sivakant Tiwari) यांनी कारकीर्द म्हणून कायदा विषयाची निवड केली. १९७१ मध्ये त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९७४ मध्ये त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या कायदा विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. १९८७ मध्ये त्यांनी अॅटर्नी-जनरल चेंबर्स सिव्हिल डिव्हिजनमध्ये काम केले आणि १९९५ मध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. विशेष म्हणजे १९७० आणि १९८० च्या दशकात घडलेल्या घातक घटनांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या तीन महत्वाच्या चौकशी आयोगांचे प्रमुखपद (वकील) देखील त्यांनी स्वीकारले. भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे तिवारी हे सिंगापूर शिष्टमंडळाचे सदस्य होते. २००३ या शिष्टमंडळाद्वारे युनायटेड स्टेट्स-सिंगापूर फ्री ट्रेड करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. ते सिंगापूर सरकारच्या कायदा टीमचे सदस्य देखील होते. सिवाकांत तिवारी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हयातीत ते एक यशस्वी वकील, कायदेतज्ञ आणि कायदेविषयक सल्लागार होते. २६ जुलै २०१० मध्ये वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र एका भारतीयाने सिंगापूरमध्ये जाऊन अनेक मोठमोठी पदे भुषवली ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

(हेही वाचा अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला EDची नोटीस; ३० कोटींचा घोटाळा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.