‘वुमन्स डे’च्या निमित्ताने अनेक ठिकाणी, अनेक प्रोडक्टस्वर तसेच ऑनलाईन शाॅपिंगवर सूट दिली जाते. अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. महिलांच्या सन्मानाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण आंतरराष्ट्रीय ‘वुमन्स डे’ हा एवढ्यापुरताच मर्यादीत आहे का? या ‘वुमन्स डे’च्या निमित्ताने एक स्त्री म्हणून आपण काही त्यातून शिकतो का? काही प्रेरणा घेण्यासारखा हा दिवस आहे का? की फक्त मुलांकडून शुभेच्छा स्वीकारणं एवढचं सध्या या दिवसाचं महत्त्व राहिलं आहे. यंदा संयुक्त राष्ट्रांनी ‘जेंडर इक्वॅलिटी’, ‘टुडे फाॅर अ सस्टेनेबल टुमाॅरो’ आणि ‘इंटरनेशनल वुमन्स डे’ ने #breakthebias ही थीम ठेवली आहे.
महिलाच करतायेत ट्रोल
जगात 8 मार्च हा दिवस महिलांच्या नावे समर्पित करत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण हा दिवस साजरा होत असताना संपूर्ण पुरुष समाज तर या दिवसाला समर्थन देतोच, पण महिलाच महिलांच्या समर्थनार्थ आहेत का? अनेकदा महिलाच महिलांच्या विरुद्ध उभ्या राहिलेल्या आपण पाहतो. असे अनेक अनुभव प्रत्येक महिलेला आलेच असतील. सोशल मीडियावर अनेक मुव्हमेंट ट्रेंड झाल्या. यातून अनेक महिलांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात घडलेल्या अत्याचारावर उघडपणे भाष्य केलं. त्यातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे तनुश्री दत्ताने मराठी अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेला आरोप होय. या ‘मी टू’ चा आधार घेत, तनुश्रीने आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. पण इतक्या वर्षांनंतर तिला जाग आली का? असं म्हणत अनेक महिलांनीच तिला ट्रोल केलं. इतक्या लांबच कशाला मराठमोठी अभिनेत्री हेमांगी कवी हीने बाई, ब्रा आणि बुब्स हे हॅशटॅग सुरु केलं, आणि तिच्या या चळवळीला समर्थन देण्याऐवजी अनेक महिलांनीच तिला ट्रोल केलं. अमेरिकेतील गटाचं ‘अवर बॉडी अवर सेल्व्ह’ हेही भारतापर्यंत पोहचलं होतं.
Change starts at home.
Men and boys have a key role to play in ensuring a more equal sharing of unpaid care work within households. #BreakTheBias #LastingChange #IWD2022@oxfaminKE pic.twitter.com/9rjOOKKT43— Youth Alive! Kenya (@YouthAliveKenya) March 7, 2022
म्हणून स्त्रीयांवरील अत्याचार थांबले का?
त्यामुळे महिलांनी स्वत:हून सक्षम होणं, आत्मनिर्भर होणं अतिशय गरजेच आहे. कोणावरही अवलंबून न राहता प्रत्येक स्त्रीने स्वत:च अस्तित्व निर्माण करायला हवं हीच काळाची गरज आहे. या एका दिवसाच्या सोहळ्याने स्त्रियांच्या प्रश्नांकडे तात्पुरतं लक्ष वेधलं जातं. या वर्षीच्या थीमनुसार बायस मोडून काढायचे आहेत. वर्षानुवर्ष वुमन्स डे साजरा केला जातोय तरीही स्त्री भ्रूण हत्या अद्याप थांबली आहे का? महिला दिनाच्या दिवशी कोणतीच महिला घरगुती हिंसाचाराला बळी जात नाही का? अजूनही एकही स्त्री हुंड्या सारख्या कुप्रथेची बळी पडत नाही का?
Proud and not prejudiced – She is capable, dedicated, hard-working and responsible for her actions.
This International Women's Day, let's stand against biases. Let us support her in every decision she makes, because she will surely make it.#internationalwomensday #Breakthebias pic.twitter.com/ZbsofMDger
— All Time Design (@AllTime_Design) March 7, 2022
( हेही वाचा: #RussiaUkraineWar चर्चेची तिसरी फेरी! जाणून घ्या भारताची भूमिका )
खरच हे घडतय का?
आपण सगळ्याच महिला आहोत म्हणून एक महिला समोरच्या महिलेचं नुकसान करत नाही का? आणि सगळ्याच महिला या एकमेकींना स्त्री म्हणून सन्मानाने वागवतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर ही सकारात्मक आहेत का, तर नाही. मग आपण एक स्त्री म्हणून कुठे उभं राहतो? हे या महिला दिनी पाहण्याची आणि त्यावर काम करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या महिला दिनामागील योग्य तो उद्देश समजून घेऊन प्रत्येक महिलेने समोरच्या महिलेला एक महिला म्हणून वागवलं पाहिजे, स्त्रीच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करु नये. यासाठी प्रत्येक स्त्रीने स्वत:ला विचारुन त्यावर काम करणं सध्याची गरज आहे. जागतिक महिला दिनी फक्त एका दिवसापुरतं मर्यादित न ठेवता रोजच महिलांनी महिलांना सन्मानपुर्वक वागणूक दिली पाहिजे.
Join Our WhatsApp Community